रांजणगाव MIDC त कोरोनाबाबत पसरवली अफवा अन्...

Image may contain: 1 person
शिरूर, ता. 13 मे 2020 (PoliceKaka): रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची अफवा पसरविल्या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कोरोना रोगाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची अफवा गोकुळ राजू शिंदे (वय  27, रा. मलठण फाटा शिक्रापूर, मुळगाव मु. पो.जळके खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि शिरीष म्हस्कू डोमाळे (वय 26, रा.वाबळे वाडी शिक्रापूर)  यांनी त्यांचे मोबाईल फोनच्या स्टेटसवर पोस्ट ठेवून व ती एकमेकात प्रसारित करून खोटी अफवा पसरल्याप्रकरणी रांजणगाव गणपती येथील गाव कामगार तलाठी सतीश कैलास पलांडे यांनी फिर्याद दिली होती. यावरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी करत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जयंत मीना (अप्पर पोलिस अधीक्षक बारामती) आणि श्रीमती ऐश्वर्या शर्मा (उपविभागीय पोलिस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार तुषार पंधारे, पोलिस नाईक अजित भुजबळ, पोलिस नाईक मंगेश शेळके, पोलिस नाईक प्रफुल्ल भगत यांनी केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस हवालदार चमन शेख करत आहे.दरम्यान, कोरोना विषयक अफवा पसरून औद्योगिक क्षेत्रात अथवा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या