शिरूर तालुक्यात पुन्हा खळबळ; कोरोनाची लागण...

https://scontent.fnag4-1.fna.fbcdn.net/v/t39.2147-6/c0.9.476.249a/p476x249/97081735_696993811055803_6626270398897979392_n.jpg?_nc_cat=100&_nc_sid=eaa83b&_nc_ohc=84SMv6o6M54AX_we1c1&_nc_ht=scontent.fnag4-1.fna&oh=96da3146d6db10939d8e7e23bc6da9cc&oe=5EE2AFE1शिरूर, ता. 15 मे 2020: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनावर प्रतिंबध घालण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. शिरूर तालुक्यातही रुग्ण सापडू लागले आहेत.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती शिरूर प्राथमिक रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. यामुळे शिरूर तालुक्यात व शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारेगाव येथील 80 वर्षीय वृद्ध महिला छातीत दुखत असल्याने काही दिवसापूर्वी बाबूराव नगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आली होती. परंतु, येथे एक दिवस उपचार केल्यानंतर नगर येथील हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. परंतु, तेथून या महिलेला पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार करत असताना संशय आल्याने महिलेचे नमुने करोना तपासणीसाठी पाठविण्यात आले. याचा अहवाल हाती आला असून, पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर खळबळ उडाली. शिरूरजवळ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहे. दरम्यान, शिरूरमधील वैद्यकीय पथक कारेगाव येथे दाखल झाले आहे.
दरम्यान, रांजणगाव एमआयसीडीमध्ये अनेक कामगारांचे वास्तव्य आहे. शिवाय, शिरूर शहरामध्येही अनेकानी प्रवेश केला आहे. बाबुराव नगर येथे मोठी वस्ती असून येथील अनेक लोक शिरूर शहरात खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या