विवाहाचा खर्च टाळून त्यांनी निभावले सामाजिक दायित्व

Image may contain: 4 people, including SachinRaje Tambe, people standing and wedding
तळेगाव ढमढेरे, ता. ५ मे २०२० (एन बी मुल्ला): तळेगाव ढमढेरे येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे यांनी कोरोनाच्या संकटामुळे आपल्या मुलाचा विवाह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला तसेच लग्नाचा खर्च टाळून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी व अन्य संस्थांना ३३ हजार रुपये निधी देऊन गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच वाटप करून समाजात आदर्श निर्माण केला आहे.तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील डॉ. राजेंद्र ढमढेरे यांचा मुलगा रोहन व महेंद्र सुक्रे यांची मुलगी मानसी यांच्या विवाह सोहळ्याचे तळेगाव ढमढेरे येथे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटामुळे विवाह अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. डॉ. ढमढेरे यांनी लग्नासाठी होणारा खर्च कमी झाल्याने सामाजिक  जबाबदारी म्हणून पंतप्रधान साहाय्यता निधीस ११ हजार आणि हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयास ११ हजार तसेच आर.एस.एस.जनकल्याण समितीस ११ हजार असे ३३ हजार रुपयांचे धनादेश या विवाह सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.


यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष जयश्री पलांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक अशोक पलांडे, आर.एस.एस.चे विभागिय संघचालक संभाजी गवारे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, विजय ढमढेरे, यशवंत ढमढेरे, संदीप ढमढेरे, संजय ढमढेरे, रविंद्र पिंगळे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या