शिरूर तालुक्यातील युवकाला कोरोणाची लागण...

शिरूर, ता. 18 मे 2020: जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, कोरोना शिरूर तालुक्याची पाठ सोडायचे नाव घेत नाही. शिरूर तालुक्यातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.


शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका 25 वर्षीय युवकावर शिक्रापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. 15 मे रोजी पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याची कोरोना तपासणी करण्यात आली असून, त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने पारोडी - शिवतक्रार म्हाळुंगी व आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जाऊन, कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थांशी चर्चा केली.

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील 15 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली. शिवाय, सदर युवकाला कोरोनाचा संसर्ग नेमका कोठे झाला याचा तपास आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. युवकाला कोरोनाची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून संपूर्ण गाव 14 दिवस बंद करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता लॉक डाऊनचे नियम पाळून, घरात बसूनच स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या