मुलीचं बाळंतपण बापाच्या जीवाला मात्र घोर...

No photo description available.
मांडवगण फराटा, ता. १९ मे २०२० (संपत कारकुड): कोणत्याही मुलीचं बाळंतपण म्हटले कि काळजाचा ठोका चुकविणारा क्षण, तिचा दुसरा जन्मच जो क्षण स्वतः ती गरोदर बाई आणि तिचे नातेवाईक अनुभवत असतात. अशामध्ये जर एखाद्या हातावर पोट असणाऱ्या मजुराची मुलगी बाळंतपणासाठी सरकारी दवाखाण्यात नेली आणि तिथल्या डॉक्टरांनी तुमची मुलीची डिलिव्हरी आमच्याकडे होऊ शकणार नाही, असे सांगितले, तर पालकांची काळजी आणखीनच वाढते. सरकारी दवाखान्यातील कर्मचारी सिझरचे पेशन्ट असल्यास असे पेशन्ट पुढे घेऊन जाण्याबाबत सांगतात. ऐनवेळेला असा प्रसंग आला की सामान्य नागरिक मात्र गोंधळून जातो. तत्काळ १०८ वर फोन केला तर ऍम्ब्युलन्सही मिळेल का...? वेळेत येईल का...? याची अजिबात खात्री नसते. मिळाली तर सदर पेशन्टला दौंड किंवा ससून पुणे येथे घेऊन जावे लागते.तोपर्यंत बाळ आणि बाळंतीण यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो.


शिरुर तालुक्यात एकुण ५ ग्रामीण रुग्णालय असुन त्यातील मलठण आणि पाबळ या २ ग्रामीण रुग्णालयाची कामे अंतिम टप्यात आली आहेत.शिरुर, शिक्रापुर आणि न्हावरे या ३ ग्रामीण रुग्णालयात गरोदर स्रियांसाठी सिझर करण्याची सोय नसल्याने अनेक मुलींच्या बापांना खाजगी दवाखान्यात मुलींना बाळंतपणासाठी अ‍ॅडमिट करावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांना दाखल केले आणि जर तिच सिझर होणार असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात कोणतीही आधुनिक तसेच अत्याधुनिक सोई-सुविधा नसल्यामुळे बहुंतांश गरोदर महिलांना खासगी दवाखाण्याचा रस्ता धरावा लागण्याचा प्रसंग मांडवगण फराटा परिसरातील नातेवाईकांना येत असून यामुळे ग्रामीण महिलांना मॅटर्निटीसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.


शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील पेशन्टला सुखरूप बाळंतपणासाठी १०० ते १५० किलोमीटर प्रवास करून रुग्णालय गाठावे लागते. यासाठी दीड ते दोन तास लागतात. प्रवासात गरोदर महिलेला नाहक वेदनेला सामोरे जावे लागत आहे. यावर अधिक माहिती घेतली असता. असे निदर्शनास आले की पेशन्टचे सर्व रिपोर्ट पाहून ते सिझरिन आहे का हे पहिले जाते. असल्यास ते सरकारी दवाखान्यात नेण्याची माहिती दिले जाते. बऱ्याच वेळेला नातेवाईकांना आपल्या जबाबदारीवर गरोदर महिलांना घेऊन पुढे वाटचाल करावी लागते. पहिल्या बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांबाबत सिझरची शक्यता जास्त असते.त्यामुळे अश्या गरोदर महिलांना दौंड किंवा पुणे येथे मोठ्या सरकारी दवाखान्यात पाठवले जाते.गरोदर महिलेची अवस्था बिकट असेल तर तिला नाईलाजाने जवळच्या खासगी दवाखान्यात घेऊन जावे लागते. अश्या दवाखान्यात मात्र नातेवाईकांना ५० हजार ते १ लाख रुपयापर्यंत खर्च येतो. एक जीव मोकळा होईपर्यंत नातेवाईकांचा जीव मात्र टांगणीला असल्याने दवाखान्याची भरमसाठ बिल पाहुन नातेवाईकांचे  डोळे पांढरे होत आहेत. शिरुर तालुक्यात सरकारी दवाखान्यात "सिझर" ची सोय नसल्यामुळे गरोदर महीला आणि नातेवाईकांना विचित्र अनुभवास सामोरे जावे लागत आहे. एकीकडे आलिशान मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटलची संख्या वाढत असताना सरकारी पातळीवर मात्र सुसज्ज मॅटर्निटी हॉस्पिटल का नाही...? सिझरच्या नावाखाली लाखो करोडोची उलाढाल करणारी हॉस्पिटल या संधीचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलत असून नातेवाईक मात्र कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.
क्रमश:

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या