कवठे येमाई येथे ५ वर्षीय मुलीला कोरोना

शिरुर, ता. २३ मे २०२० (प्रतिनिधी): कवठे येमाई (ता.शिरुर) येथील ५ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कवठे येमाई येथील एकाच कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी या कुटूबांतील ५ वर्षीय चिमुकलीचा आणि आजी-आजोबा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर रात्री पुन्हा दुसऱ्या जुळ्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या सर्व रुग्णावरती पुणे येथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून हे सर्व कुटुंबीय १५ तारखेला मुंबई येथून आपल्या मूळ गावी आले होते.शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन पुणे आणि मुंबई वरुन गावाला येणाऱ्या लोकांमुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होत आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.शिरुर तालुक्यात आतापर्यंत १६ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असुन, त्यातले ७ रुग्ण बरे झाले आहेत तर ६ जणांवर उपचार सुरु असुन आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात शिरुर तालुक्यात बाहेरुन आलेल्या ६ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे तळेगाव ढमढेरे येथील एक महिला, शिक्रापूर येथील एक कामगार तरुण, तर कारेगाव येथील एका वृद्ध महिला अश्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या