संगिता महेंद्र मल्लाव

नाव : संगिता महेंद्र मल्लाव
पत्ता : काचीआळी, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे.
जन्मतारीख : ०४/०७/१९६९
ईमेल : mallavsangeeta@gmail.com
शिक्षण : बी.ए
आवड : समाजसेवा
पद : नगरसेविका, शिरुर नगरपालिका, शिरुर

सविस्तर माहिती :
 • परंपरेनुसार राजकिय वारसा पुढे चालवत नुकतेच नगरपालिकेवर बहुमतांनी निवड.
 • १९९७ साली पहिली निवडणुक लढवली.
 • पती स्व. महेंद्र मल्लाव गेली १५ वर्षे सलग नगरपालिकेवर नगरसेवक म्हणुन कार्यरत होते. परिसरात हक्काचा माणूस म्हनुन ओळख.
 • पतीच्या सामाजिक कार्याबरोबर स्वत:ची वेगळी ओळख.
 • २२ महिलांना समाजकल्याणच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करुन स्वयंपुर्ण करण्यासाठी हातभार.
 • महिलांसाठी बचतगटामार्फत विविध अनुदानप्राप्त करण्यासाठी प्रयत्न. त्याचप्रमाणे महिलांसाठी वेळोवेळी विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले असून, त्याचा महिलांना लाभ झाला आहे.
 • या पुर्वी रेशनिंग दक्षता समितीवर देखिल नेमणुक झालेली असून, काँग्रेसच्या महिला संघटक म्हणून काम पाहत आहे.
 • विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जनमानसात ओळख आहे.
 • यशस्विनीच्या माध्यमातून नेहमीच कामात अग्रेसर असून महिला व अनाथ मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
 • बालगृहाच्या संदर्भातील आंदोलनात १३ दिवसांचा यशस्वी लढा दिला आहे.
 • यापुढे नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या विविध अडचणी, समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.
Comment Box is loading comments...

संबंधित लेख