गाव - वाजेवाडी

सरपंच उपसरपंच
सरपंच - वैशाली संतोष गोसावी
उपसरपंच - कानिफनाथ देवराम मांजरे
गावची लोकसंख्या - १६०८
दूरध्वनी क्रमांक - उपलब्ध नाही
तलाठी - उपलब्ध नाही
ग्रामसेवक - उपलब्ध नाही

वाजेवाडी हे गाव चाकणजवळ आहे. गावामध्ये वाजे आडनावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बहुतेक गावाला वाजेवाडी हे नाव पडले असावे. गावामध्ये पद्मावती, श्रीकृष्णाचे मंदिर आहे. महानुभव पंथाकडून श्रीकृष्ण मंदिराचे काम पाहिले जाते. गावामध्ये नेहमी धार्मिक कार्यक्रम होत असून, यामध्ये गावकरी सहभागी होतात. गावात वाटी-लोटी नावाची टेकडीही असून, येथे राम-सीतेने वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. मारुती नावाची टेकडी असून, तेथे मारुतीचे मंदिर आहे. गावामध्ये दरवर्षी पद्मावती देवीची यात्रा भरत असून, विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यात्रेदरम्यान तमाशाचाही कार्यक्रम आयोजित केला जातो. औद्योकीकरणामुळे गावाला महत्त्व आले आहे. येथील शेतकरी बाजरीसह इतर पिके घेतात.

आपल्या गावच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क-

तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

  • 1