गाव - कवठे यमाई

सरपंच उपसरपंच
सरपंच - संगिता रामदास रोहिले, मो. 9960255547
उपसरपंच - कानिफनाथ बन्सी हिलाळ
गावची लोकसंख्या - ८९९०
दूरध्वनी क्रमांक - 9960255547
तलाठी - ज्ञानदेव किसनराव वाळके, मो. 9822094765
ग्रामसेवक - अशोक बाबूराव दौंडकर, मो. 9765616229

शिरूर-मंचर रोडवर असणारी व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातील असंख्य भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेली श्री येमाई देवी, तीर्थक्षेत्र असलेली कवठे येमाई ही शिरूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील १५ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत. २४ ऑगस्ट २०१० रोजी संगीता रामदास रोहीले यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी अंकुश नाना शिंदे निवड झाली. 

विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील व या भागातील सर्वसामांन्याचे कैवारी माजी आमदार पोपटराव गावडे, जि. प. सदस्या सुनीताताई गावडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे आणून ती प्रत्यक्षात साकारण्याचा गावाने सपाटाच लावला आहे. त्या मध्ये गावठाण अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, कवठे-मिडगुलवाडी रस्त्याचे डांबरीकरण, घोडे वस्ती येथे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन शाळा इमारत, इचकेवाडी येथे स्मशानभूमीचे काम सुरू, साईनगर येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामास मान्यता व काम सुरू, गावचे आराध्य ग्रामदैवत श्री येमाई देवी मंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याकामी सततचा पाठपुरावा केल्याने तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जा प्राप्त. शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्‍नी तत्पर पाठपुरावा त्यामुळे वर्षातच गावात ६३ के.व्ही.चे ९ ट्रान्सफॉर्मर तर २५ के.व्ही.चे १४ ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे कार्य. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील अनेक गरजू लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत सायकली उपलब्ध करून दिल्या.

सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करताना 'लेक वाचवा-स्री जन्माचे स्वागत करा' हे अभियान राबविले. तंटामुक्त समिती मार्फत गावातील तंटे गावातच मिटविण्याचा कसोशीने प्रयत्न. सार्वजनिक आरोग्य सेवा सुरळीत सुरू असावी या करिता वेळोवेळी लक्ष, नुकतीच जि.प.कडून प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने नवीन रुग्णवाहिका केंद्रात दाखल झाली आहे. हरिजन वस्तीवरील समाज मंदिर दुरुस्ती करिता ५० हजार रुपयांचा निधी मिळवून दिला. ग्रामपंचायतीच्या १५ % निधीतून तेथील स्टेज, सभामंडप दुरुस्ती, मातंग वस्तीवरील समाज मंदिराची दुरुस्ती. एक वर्षाच्या आतच गावातील दारिद्य्र रेषेखालील १२ लाभार्थींना घरकुलांची मंजुरी मिळवत घरकुले प्राप्त करून दिली.

आगामी काळात गावातील येडे-बोऱ्हाडे वस्ती, इनामवस्ती, काळूबाई नगर, माळीमळा या ४ ठिकाणी अंगणवाड्यांच्या इमारती बांधणे, रयत शिक्षण संस्थेच्या दुर्बल शाखा निधीतून व ग्रामस्थांच्या वर्गणीतून न्यू इंग्लिश स्कूल येथे ४ सुसज्ज वर्गखोल्यांचे स्लॅबचे बांधकाम करणे, इत्यादी अनेक समाज उपयोगी विधायक कामे करण्याचा मानस.
आपल्या गावांच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322


शिरूर तालुक्यात बाहेरील नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही