गाव - कोंढापुरी

सरपंच उपसरपंच
सरपंच - स्वप्निल अरुण गायकवाड, 9226940445
उपसरपंच - माणिक वसंतराव गायकवाड
गावची लोकसंख्या - २०२१
दूरध्वनी क्रमांक - 9226940445
तलाठी - उपलब्ध नाही
ग्रामसेवक - उपलब्ध नाही

कोंढापुरीचे सरपंच स्वप्निल गायकवाड

सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान कै. अरुणआबा गायकवाड यांचा वारसा पुढे चालविणारे युवा नेतृत्व कोंढापुरीचे सरपंच स्वप्निल गायकवाड...

कै. अरुणआबा गायकवाड -
कै. अरुणआबा गायकवाड हे सर्वसामान्यांचे गोर-गरीब शेतकऱयांचे, कार्यकर्त्यांचे, गावोगावच्या सरपंच, सोसायटी चेअरमन, उपसरपंच, पदाधिकारी यांचे लाडके व्यक्तीमत्व म्हणजे आबा. तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱयांपासून राजकारणातील मोठे कार्यकर्ते, नेत्यांपर्यंत आदराचे प्रेरणास्थान म्हणजे आबा. शिरूर तालुक्यातील हरीतक्रांतीचे प्रणेते, औद्योगिकरणाला जोरदार पाठिंबा देणारे नेते. आज तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही भागात गेले आणि "आबा' हे दोनच शब्द उच्चारले तरीही चटकन अनेकांच्या डोळ्यात पाणी येणारे समाजसेवी नेतृत्व म्हणजेच कै. अरुणआबा गायकवाड होय.

कोंढापूरीसारख्या छोट्या गावामधून आबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली. तरुण वयात आबांनी कबड्डी या खेळाच्या माध्यमातून गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे नेतृत्व केले. कबड्डी या खेळाला खऱया अर्थाने न्याय देण्याचे काम आबांनी केले. आज कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्याचे काम केलेल्यांमध्ये आबांचेही योगदान आहे.

समाजाप्रती खूप मोठे योगदान देण्याचे कार्य अरुणआबांनी आपल्या राजकीय जीवनात केले. खेळामार्फत तरुण वयात आबांनी मोठा जनसंपर्क वाढवून आफाट मित्र परिवार जोडला. त्यांच्या काळात वाहनांची, मोबाईलची सुविधा उपलब्ध नसतानाही प्रत्येक वाडी-वस्तीवर पोहचणारे युवक नेतृत्व म्हणजे अरुणआबा.

मा. शरद पवार यांना आदर्श मानून आबांनी आपल्या राजकरणाला सुरवात केली. प्रथम शिरूर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तरुणांची प्रचंड फौजच्या फौज आबांनी उभी केली. राजकरणापेक्षा समाजकारण जास्त हे ब्रिद वाक्य त्यांनी तरुणांमध्ये पेरले.

अरुण आबांचा वारसा पुढे सुरू....
कै. अरूण आबा गायकवाड यांच्या हयातीतच आबांच्या समाजसेवेचा, सर्वसामान्यांशी नाळ जोडण्याचा वारसा घेऊनच राजकीय जीवनाची वाटचाल करणारे युवा नेतृत्व उदयास येऊ घातले आहे, ते म्हणजे आबांचे चिरंजीव व कोंढापूरी गावचे सरपंच स्वप्निल गायकवाड. वयाच्या २३ व्या वर्षीच सरपंच पदाची कारकिर्दीस सुरवात करून, संपूर्ण महाराष्ट्रात तरूण सरपंच म्हणूनच नोंद झाली आहे. खेळण्या-बागडण्याच्या, अभ्यासाच्या वयात आबांच्या निधनानंतर एक मोठी समाजसेवेची जबाबदारी पार पाडण्याचे कठीण कार्य स्वप्निल गायकवाड यांनी हाती घेतले आहे.

आबांप्रमाणेच मा. शरद पवार, अजित पवार यांना आदर्श मानून, शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार, ज्येष्ठ नेते कुंडलिकराव थोरात, पोपटराव गावडे या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच स्वप्निल गायकवाड यांनी समाजसेवेची आस धरली आहे. सोबत, आबांनी केलेल्या समाजसेवेची प्रेरणा घेऊनच वाटचाल करत आहेत. कोंढापुरी या गावच्या आपल्या एक वर्षे चालू सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी खूप सुधारणा घडवून आणल्या आहेत. गावात सर्वसामान्य कुटुंबाबरोबरच सर्व जातीधर्मातील जनतेला एकत्र आणण्याचे कार्यही केले. ग्रामपंचायतीमध्ये सुधारणा घडविण्याचे कार्यही चालू आहे. गावात सौर दिवे बसवून एका नवीन प्रकाशाची सूर्यकिरणांची दिशा दिली आहे. नवीन सुधारित पाणी योजना राबवून घरोघरी नळ जोडणीचे काम हाती घेतले आहे. औद्योगिकरणाच्या कार्यात स्थानिकांना नोकऱया मिळवून देण्याचे कार्यही हाती घेतले आहे. गावातील शालेय संस्थांना बळकट करून, विद्यार्थी घडविण्याचे कार्यही हाती घेतले आहे. सतत स्वताःला कार्यात गुंतवून आबांप्रमाणेच समाजाच्या सेवेत राहण्याचा निश्चय स्वप्निल गायकवाड यांनी केला आहे.

संपूर्ण गावामध्ये नवीन सिमेंट रस्ता करण्याचा आराखडाही मंजूर केला आहे. गावात शौचालय कार्य शंभर टक्के पूर्ण करीत आणले आहे. तंटामुक्ती कार्यक्रम यशस्वी राबविण्याचे कामही चांगले केले. कै. अरूणआबा गाकवाड यांचे प्रमाणेच समाजसेवेचा वारसा त्यांना पुढे चालवायचा आहे. परंतु, आपल्या अभ्यासातून जरा वेगळाच ठसा उमटविण्याची जिद्द बाळगली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडलेल्या विचारांचा प्रभावही स्वप्निल गायकवाड यांच्यावर पडलेला आहे. हजारे यांनी मांडलेल्या स्वयंपुर्ण गाव खेडे याचाही त्यांनी अभ्यास केला आहे. म्हणूनट त्यांनी येत्या ऑगस्ट महिन्यात आपल्या सरपंच पदाच्या एक वर्षे पूर्ण कार्यकाळात एक महत्तवपूर्ण अशी योजना राबविण्याचे ठरविले आहे. ती योजना म्हणजे "सरपंच आपल्या दारी'.  प्रत्येक वॉर्डातील घरोघरी जाऊन जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न. सोबत शासकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सोसायटी सचिव, मुख्याध्यापक, ग्रामशिक्षण समिती, तंटामुक्ती अध्यक्ष या सर्वांना सोबत घेऊन जागेवच सर्वांचे प्रश्न सोडविणे अशी अतिशय महत्त्वाची, जनतेच्या जिव्हाळ्याची योजना संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श होऊ शकेल अशी योजना राबवायची आहे. या योजणेनुसार ग्रामसुधार समिती वॉर्डनुसार स्थापना करून, एक क्रांती घडविणार आहे.

गावाबरोबरच तालुका, जिल्हा पातळीवर संधी मिळेल तशी अनेक कार्य करावयाची आहेत. आताही ही कार्य सुरूच आहे. कराटे असोशिएशनचे अध्यक्षपदी भूषविले आहे. सरपंच स्वप्निल गायकवाड हे एक "आदर्श सरपंच' बनण्यासाठी परिक्षम घेत आहेत. शासन दरबारी सुद्धा लवकरच त्यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त होईल अशी अपेक्षा.


आपल्या गावच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क-
तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322