माजी जवानाचे वडील कोरोनाने गेले अन् अंधार होता...

कोरोनाची लागण झाल्यामुळे अशोकच्या वडिलांचे ससून रुग्णालयात निधन झाले. अशोकच्या वडिलांनी प्रचंड कष्ट केले होते. मुलाचे यश पाहात होते. एका जवानाचे वडील म्हणून अभिमानाने मिरवत होते. पण, कुठे चांगले दिवस आले होते तर कोरोनाला पाहवले नाही. वाईट.... असो, अशोक सांगत होता...

गावातील मित्राचा फोन आला. आपला वर्गमित्र आणि माजी सैनिक अशोक शेळके याचे वडील कोरोनाने गेले. ऐकून धक्का बसला. अशोकच्या वडिलांना लहानपणापासून कष्ट करताना पाहात आलो होतो. अशोकची जिद्द अनुभवली होती. एक क्षणात डोळ्यासंमोर चित्र उभे राहिले....

गावातील मित्र दिलीप थोरातचा साधारण रात्री नऊच्या सुमारास फोन. गावाकडून फोन आल्यामुळे तत्काळ घेतला आणि दिलीप बोल असे म्हटले. दिलीप बोलत होता. मी फक्त ऐकत होतो.... काही क्षण काय बोलावे ते कळत नव्हते. फक्त ऐकतच होतो... दिलीप आणि अशोक सोबतच होते. दिलीपचे बोलणे झाल्यावर अशोक पण बोलू लागला.... त्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. पण, वडील गेल्याने अशोकवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. हे जाणवत होते...

अशोक आणि दिलीप म्हणजे माझे लहानपणापासूनचे मित्र. दिलीप वाघाळे (ता. शिरूर) गावचा माजी उपसरपंच. तर अशोक शाळा संपल्यानंतर लष्करात भरती झाला होता. अशोकचे लष्करातील गणवेशातील फोटो पाहिले की अभिमानाने उर भरून यायचा. आपला मित्र सीमेवर दुश्मनाशी दोन हात करतो, देश सेवा करतोय. खूप छान वाटायचे. अशोक सेवा निवृत्त झाला. सध्या तो सेवा निवृत्तीनंतर तो महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहे....

महावितरणने घेतली जवानाच्या बातमीची तत्काळ दखल!

कोरोनाची लागण झाल्यामुळे अशोकच्या वडिलांचे ससून रुग्णालयात निधन झाले. अशोकच्या वडिलांनी प्रचंड कष्ट केले होते. मुलाचे यश पाहात होते. एका जवानाचे वडील म्हणून अभिमानाने मिरवत होते. पण, कुठे चांगले दिवस आले होते तर कोरोनाला पाहवले नाही. वाईट.... असो, अशोक सांगत होता... वडील कोरोनाने गेल्यामुळे होम क्वॉरंटाईन व्हावे लागले. गेल्या काही दिवसांपासून घरातच होतो. पण, कुटुंबियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. गेल्या महिनाभरापासून घरात वीज नाही. शिवाय, घरातच बसावे लागत असल्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला. प्लिज, काही तरी कर.... 'प्लिज' बोलल्यामुळे मन हेलावले.

दोघांसोबत बोलून फोन ठेवला. पण, विचार मनातून जात नव्हता. काही तरी करायलाच हवे. अशोकच्या विचारानेच सकाळी जाग आली. सकाळी लवकर एक महावितरणला ट्विट केले. ट्विटमध्ये अनेक मान्यवरांना ठेवले. शिवाय, ट्विटमध्ये अशोकचा (90966 05526, 8788235595) मोबाईल क्रमांक दिला. पुढच्या काही तासातच त्या ट्विटची महावितरणने दखल घेतली. विशेष म्हणजे दुसऱयाच दिवशी डीपी बसवली गेली आणि अशोकच्या घरात वीज आली.

जम्बो कोविड सेंटरने माणसं अक्षरशः तडपडून मारली; एक थरारक अनुभव...

अशोकने वीज आल्याबद्दल धन्यवादासाठी फोन केला. म्हटलं अशोक, तुम्ही सीमेवर उभे राहून देशसेवा करता. तुमच्यामुळे आम्ही किमान सुखाने तरी झोपू शकतो... आणि धन्यवाद कसले. कारण. जवान चंदू चव्हाण यांच्या जीवनावरील 'जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने 21 दिवस' हे पुस्तक मी लिहीले आहे. भारतीय जवान किती धाडसी असतात हे मी अनुभवले आहे. एका जवानासाठी आपण वीजेचा प्रश्न सोडवू शकत नाही. खरंच, महावितरणने तत्काळ दखल घेतली आणि एक महिन्यापासून प्रलंबित असलेला वीजेचा प्रश्न सोडवला. महावितरणचे मनापासून धन्यवाद आणि एका मित्रासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान....

- संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com

Image may contain: 1 person, text that says 'जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमधील छळाचे ३ महिने २१ दिवस लेखक संतोष संतोष धायबर'

(पत्रकार संतोष धायबर यांच्या फेसबुकवर साभार)

Title: journalist santosh dhaybar soldier ashok shelke mahavitran
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे