बलात्कारातील पीडित महिलेला पुन्हा धमकी

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील खळबळजनक घटना

पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. महिलेला गुंगीचे औषध देत स्वतः नशापान करून महिलेवर वेळोवेळी बलात्कार करत तिच्यावर जादूटोणा करून महिलेला संमोहित करून एका ढोंगी बाबा बरोबर शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला.

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका महिलेवर जादूटोणा करून ढोंगीबाबा सोबत देखील शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडून वेळोवेळी बलात्कार करून मारहाण तसेच गर्भपात केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला अटकेनंतर तात्पुरता जामीन मिळालेला असताना पीडित महिलेला आरोपीकडून पुन्हा धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली. पीडित महिलेने राहुल संजय वाळके (रा. पेरणे, ता. हवेली, जि. पुणे) याच्या विरोधात पुन्हा शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

शरीरसुखाला नकार दिल्याने तीक्ष्ण हत्याराने भावजयीचा खून

कोरेगाव भीमा येथील पीडित महिलेच्या पतीने पेरणे गावातील राहुल वाळके कडून काही पैसे घेतले होते. त्यांनतर राहुलची ओळख महिलेसोबत झाली त्यानंतर राहुलने पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. महिलेला गुंगीचे औषध देत स्वतः नशापान करून महिलेवर वेळोवेळी बलात्कार करत तिच्यावर जादूटोणा करून महिलेला संमोहित करून एका ढोंगी बाबा बरोबर शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडू लागला. राहुल याने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार करून महिलेला एका हॉस्पिटलमध्ये नेऊन महिलेच्या पतीच्या खोट्या सह्या करून महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेला सर्व काही प्रकार असाह्य झाल्यानंतर जीवघेणा हल्ला करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

अल्पवयीन मुलीवर तांत्रिकाने केला ८ महिने बलात्कार

याबाबत पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी लोणीकंद पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. लोणीकंद पोलिसांनी राहुल संजय वाळके याच्या विरुद्ध बलात्कार, गर्भपात, मारहाण तसेच जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. यावेळी राहुल वाळके याने न्यायालयातून अटकपूर्व जमीन मिळविला आहे. परंतु, लगेचच त्याने कोरेगाव भीमा येथे पीडित महिलेच्या घरी येऊन तू लोणीकंद पोलिस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून महिलेला मारहाण करत महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेला मारहाण करून तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर पीडित महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली होती. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी राहुल संजय वाळके याच्या विरुद्ध पीडित महिलेचा विनयभंग करत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले. वाळके याच्यावर बलात्कार प्रकरणी देखील गुन्हा नोंद करत त्याला अटक करण्यात आलेली होती.

शिवतक्रार म्हाळुंगी येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग

सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी राहुल वाळके याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती. सध्या न्यायालयाने त्याला तात्पुरत्या जामिनावर सोडलेले असताना आरोपी वाळके हा कोरेगाव भीमा येथे पीडित महिलेच्या घराजवळ जाऊन महिलेला मी तुला पाहून घेतो तुला सोडणार नाही असे म्हणून दमदाटी केली आहे. याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे याबाबत तक्रार दिली आहे.  यावेळी बोलताना सदर आरोपी हा तात्पुरत्या जामिनावर आलेला असून, घडलेल्या घटनेबाबत न्यायालयाला कळविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी सांगितले.

शिक्रापूर पोलिसांनी युवकाला लाखो रुपये दिले परत मिळवून

Title: koregaon bhima women register case against youth shikrapur
प्रतिक्रिया (1)
 
Sachin nandkumar Erande
Posted on 26 September, 2020

Barobar Kele tai ataychaar sahan karaycha nahi

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे