माजी आमदारांच्या गावातच सुविधांची वानवा

करंजावणे गाव सर्वच सुख-सोयी पासून वंचित

शिरुर तालुक्यातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगाव गणपती पासून दक्षिणेकडे ५ किलोमीटर अंतरावर करंजावणे गाव वसलेले आहे.जनसंघ म्हणजेच आत्ताचे भाजपचे माजी आमदार बाबुरावजी दौंडकर यांचे हे गाव.बाबूराव दौंडकर आमदार असताना त्यांनी त्याकाळात रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी जनावरांचा दवाखाना, करंजावणे-पुणे एसटी बस व्यवस्था अशाप्रकारच्या विविध योजना करंजावणे गावाला मिळवून दिलेल्या होत्या. रांजणगाव गणपती ते करंजावणे हा ५ किलोमीटरचा रस्ता त्यांच्याच कालावधीमध्ये झालेला होता. परंतु गेल्या ३० ते ४० वर्षांपासून आजतागायत एकाही लोकप्रतिनिधीने या रस्त्याचे काम केलेलं नाहीये.

करंजावणे: शिरुर तालुक्यातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगाव गणपती पासून दक्षिणेकडे ५ किलोमीटर अंतरावर करंजावणे गाव वसलेले आहे.जनसंघ म्हणजेच आत्ताचे भाजपचे माजी आमदार बाबुरावजी दौंडकर यांचे हे गाव.बाबूराव दौंडकर आमदार असताना त्यांनी त्याकाळात  रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी जनावरांचा दवाखाना, करंजावणे-पुणे एसटी बस व्यवस्था अशाप्रकारच्या विविध योजना करंजावणे गावाला मिळवून दिलेल्या होत्या. रांजणगाव गणपती ते करंजावणे हा ५ किलोमीटरचा रस्ता त्यांच्याच कालावधीमध्ये झालेला होता. परंतु गेल्या ३० ते ४० वर्षांपासून आजतागायत एकाही लोकप्रतिनिधीने या रस्त्याचे काम केलेलं नाहीये.

त्याचप्रमाणे गावांमध्ये विजेचा लपंडाव अधूनमधून चालूच असतो. तसेच गावामध्ये कोणत्याही मोबाईल नेटवर्कला देखील अजिबात रेंज मिळत नाही. आत्ताच्या डिजिटल युगामध्ये वावरत असताना वर्क फ्रॉम होम असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण असेल त्यासाठी इंटरनेट नेटवर्क आवश्यक असतं.
मात्र करंजावणे हे गाव इंटरनेट पासून सुद्धा वंचित आहे. अतिशय महत्त्वाचं काम असेल तर नागरिकांना गावाच्या बाहेर उंच टेकडीवर जाऊन कॉल करावा लागतो अथवा इंटरनेटचा उपयोग करावा लागतो. ५ किलोमीटर अंतरावर पुणे-नगर महामार्ग असताना देखील या गावामध्ये रस्त्याची अजिबात सोय नाही.

बाबुराव दौंडकर आमदार असतानाच म्हणजे ३० ते ४० वर्षांपूर्वी गावांमध्ये एसटी धावत होती. परंतु करंजावणे गावात आत्ता एसटी देखील उपलब्ध नाही. तसेच गावात आता कोरोणाची देखील अधिक भर पडलेली आहे. करंजावणे ते रांजणगाव गणपती या रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे एखादा रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असेल आणि त्याला लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे असेल तर करंजावणे ते रांजणगाव गणपती हा प्रवास करण्यासाठी त्याला अर्धा ते पाऊण तास लागतो आणि रुग्णालयात पोहचेपर्यंत त्याची अवस्था खूपच दयनीय झालेली असते. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
 
शिरुर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी करंजावणे ते रांजणगाव गणपती या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी  केलेली आहे. आमदारांनी ग्रामस्थांना रस्ता करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तात्पुरते काम गावातील तरुणांनी लोकवर्गणीतून केलेले आहे.परंतु या रस्त्याचे पक्के काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी आहे. त्याचप्रमाणे गावांमध्ये मोबाइल इंटरनेट कनेक्शन साठी टॉवर देखील उभारले जावेत. एसटी बस व्यवस्था सुरू केली जावी,अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.अन्यथा करंजावणे-रांजणगाव गणपती या रस्त्यासाठी आणि एसटी बस सेवेसाठी आणि इतर महत्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन देखील करण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली आहे.

 
Title: Lack of facilities in the village of former MLA
प्रतिक्रिया (1)
 
Sanjay Chordiya
Posted on 9 July, 2020

. रांजणगाव गणपती ते करंजावणे हा पाच किलोमीटरचा रस्ता आमदार एडवोकेट अशोक पवार यांच्याकडून प्रस्तावित आहे. परंतु ह्या करोना च्या संकटामुळे तो विषय थोडासा लांबणीवर पडला आहे. नक्कीच लवकरात लवकर अशोक बाप्पू हा निर्णय घेतील. आणि रस्त्याचे काम मार्गी लागेल

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे