प्रभु देवा दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत?
बॉलिवूड कलाकार त्यांच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. अभिनेता, डान्सर आणि दिग्दर्शक प्रभु देवा देखील सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. प्रभु देवाने त्याच्या फिजीओथेअरपिस्टशी लग्नगाठ बांधली आहे.मुंबई: बॉलिवूड कलाकार त्यांच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. अभिनेता, डान्सर आणि दिग्दर्शक प्रभु देवा देखील सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. प्रभु देवाने त्याच्या फिजीओथेअरपिस्टशी लग्नगाठ बांधली आहे. सप्टेंबरमध्येच त्याने विवाह सोहळा उरकला असुन अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावे; चंद्रकांत दादा पाटील
सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. १९९५ मध्ये प्रभु देवाने रामलथानशी लग्न केले होते. १६ वर्षानंतर त्याचा घटस्फोट झाला. २००८ मध्ये या दाम्पत्याने त्यांचा मोठा मुलगा गमावला होता. कॅन्सरमुळे त्याचं निधन झालं होतं. २०११ मध्ये त्याने घटस्फोट घेतला होता. त्यावेशी अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता. २०१०-२०१२ या कालावधी दरम्यान नयनतारा आणि प्रभु देवा डेट करत होते.
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी ग्रामस्थांचा पुढाकार
मात्र, आता पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक नातेसंबंधांबाबत चर्चा होऊ लागली आहे. या अभिनेत्याने मुंबईत एका मुलीशी सप्टेंबमध्ये लग्न केले आणि ते दोघेही चेन्नईमध्ये वास्तव्यास गेले आहेत. प्रभु देवाला या सर्वच गोष्टी खाजगी आणि गुप्त ठेवायच्या होत्या. मीडिया अहवालांच्या मते प्रभु देवा पाठदुखीवर उपचार करण्यासाठी या फिजिओथेअरपिस्टकडे गेला असता त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रभु देवाने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आणि त्या दोघांनी हा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत खाजगी मध्येच उरकला.
वन्य पशु पक्षी संरक्षण समितीच्या सर्पमित्रांच्या मागणीला यश
काही दिवसांपूर्वी प्रभु देवा त्याच्या भाचीशी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण मीडिया अहवालातील सूत्रांच्या माहितीनुसार प्रभु देवाने त्याच्या फिजीओथेअरपिस्टशी लग्न केलं असुन ती त्याची भाची नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रभु देवा दिग्दर्शित 'राधे' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे राधेचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.