एकाच नवऱ्याच्या दोन बायका म्हणजेच महाविकास आघाडी

माजी मंत्री राम शिंदे यांची सरकारवर खोचक टिका

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन बायका असुन त्यामुळे त्यांचा संसार अडचणीत आलेला आहे. तसेच घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. त्यामुळे जनता आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.

श्रीगोंदा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आधीच अडचणीत असुन महाविकास आघाडी सरकारने बळीराजाला दुधाचे अनुदान दिलेले नाही. तसेच शेतीला जोडधंदा असलेल्या दुधाची खरेदी खुपच कमी भावाने करुन शेतकऱ्यांना अजुनच अडचणीत आणायचं काम या सरकारने केलं आहे. स्वतः अकार्यक्षम असताना फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे काम राज्य सरकार करत आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार म्हणजे एकाच नवऱ्याच्या दोन बायका असुन त्यामुळे त्यांचा  संसार अडचणीत आलेला आहे. तसेच घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. त्यामुळे जनता आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

Title: Mahavikas Aghadi two wives of the same husband
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे