मानसी नाईक लवकरच अडकणार लग्नबेडीत...
लग्नात दिसणार ऐश्वर्या रायच्या 'जोधा अकबर' लूकमध्ये
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक येत्या १९ जानेवारीला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्नबेडीत अडकणार आहे. सध्या मानसी लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. नुकतेच तिची बॅचलर पार्टी पार पडली. त्याचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. तसेच तिने लग्नाच्या आधी काही फोटोशूट केले. ते फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक येत्या १९ जानेवारीला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्नबेडीत अडकणार आहे. सध्या मानसी लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. नुकतेच तिची बॅचलर पार्टी पार पडली. त्याचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. तसेच तिने लग्नाच्या आधी काही फोटोशूट केले. ते फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ती लग्नात कोणता लूक करणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
...तर १ फेब्रुवारीपासुन रेशन होणार बंद
मानसी नाईकला मराठी चित्रपट सृष्टीतील ऐश्वर्या राय संबोधले जाते. तिचा लूक देखील काहीसा ऐश्वर्या सारखा आहे. त्यामुळेच कदाचित मानसीने तिच्या लग्नात ऐश्वर्याचाच एक लूक फॉलो करायचे ठरवले आहे. मानसी नाईक ही जोधा अकबर मधील ऐश्वर्या सारखीच तिच्या लग्नात तयार होणार आहे. ती म्हणाली की, 'ऐश्वर्या ही माझी आवडती अभिनेत्री आहे. ती जशी जोधा अकबरमध्ये तयार झाली होती तसे तयार होणे हे माझे स्वप्न आहे.
विक्रोळीत बाईकवर जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणांना बेड्या...
मी जरी महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करत असले तरी आम्ही लग्न राजेशाही पद्धतीच करणार आहोत. १९ जानेवारीला मानसीचे प्रदीप सोबत विवाह पार पडणार आहे. त्यानंतर ते दोघेही प्रदीपच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहेत. मुंबईत या दोघांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार असुन त्यानंतर फरिदाबादला प्रदिपकडील काही विधी पार पडणार आहेत.