मराठी युवकांची राजकारण्यांकडून सुरू असणारी ससेहोलपट त्वरित थांबवा...

सर्वसामान्य मराठा तरुणांना पडलेला प्रश्न हाच आहे की, आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना या दरम्यान होणाऱ्या पोलिस व तलाठी भरती आरक्षणाचा लाभ त्यांना होणार की नाही?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली असून, मोठ्या खंडपीठाने याचिका अवलोकनार्थ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांनी यावर राजकारण सुरू केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शक्तीनिशी मराठा आरक्षणाचे संरक्षण सर्वोच्च न्यायालयात करण्याची ग्वाही दिली आहे. परंतु, महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यात तलाठी भरती करण्याचे घोषित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांनी पोलिस खात्यातील रिक्त 12 हजार पदे त्वरित भरण्याची घोषणा केली.

सर्वसामान्य मराठा तरुणांना पडलेला प्रश्न हाच आहे की, आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना या दरम्यान होणाऱ्या पोलिस व तलाठी भरती आरक्षणाचा लाभ त्यांना होणार की नाही? बारकाईने पाहिले असता सर्वसामान्याच्या लक्षात येते की कुठल्याही पुढाऱ्याला मराठा आरक्षणाबाबत आस्था नाही. राजकारणातील आपली मार्केट प्राइज वाढवण्यासाठी सर्वच पक्षाचे पुढारी आरक्षणाच्या मुद्याचा उपयोग करून घेत आहेत. तरी शासन, विरोधी पक्ष व सर्व संबंधितांना कळकळीची विनंती आहे की, मराठा आरक्षणावर न्यायालयासमोर एकत्रित भक्कम पणे समाजाची बाजू मांडावी व मराठा युवकांची सुरू असणारी ससेहोलपट थांबवावी..

- श्री. अरविंददादा साहेबराव ढमढेरे, माजी कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.

Title: maratha reservation and politics article write arvind dhamdh
प्रतिक्रिया (1)
 
सौ .रूपालि अनिल ढमढेरे
Posted on 18 September, 2020

मराठा आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. मराठा समाजातील मुलांची शैक्षणिक नोकरीसंदर्भात ससेहोलपट नक्कीच थांबवावि.

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे