Video: मसाला दूध व्हिडिओ...

अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवून त्यात केशर आदी मसाला घालून ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे.

शारदीय नवरात्री नंतर येणारा सण म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima). शरद पौर्णिमा (Sharad Poornima) म्हणून देखील ओळखला जाणारा हा सण भारतामध्ये अश्विन पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो.

कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याचे सांगीतले आहे. लंकाधीपती रावण या अश्वीन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं आरश्याच्या सहाय्याने आपल्या नाभिव्दारे ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारूण्य प्राप्त  होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगीतली आहे.

अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवून त्यात केशर आदी मसाला घालून ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधुन अधीक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करतं. यामुळेच पुर्वीपासुन ऋषीमुनींनी दुध चंद्रप्रकाशात आटवण्यासंबंधी सांगीतले आहे. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.

Video: बटर चिकन किंवा मुर्ग मखनी...

Title: masala doodh recipe by Priya patil on FoodBox
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे