गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार; एका महिलेला अटक

कोल्हापूर पाचगाव येथे भाड्याने राहत असलेली परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यास सहाय्य केल्याबद्दल मंगळवार (दि. १२) रोजी करवीर पोलिसांनी सीमा दिलीप योगी (वय २२) रा. मूळ राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर या महिलेस अटक केली.

कोल्हापूर: कोल्हापूर पाचगाव येथे भाड्याने राहत असलेली परप्रांतीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यास सहाय्य केल्याबद्दल मंगळवार (दि. १२) रोजी करवीर पोलिसांनी सीमा दिलीप योगी (वय २२) रा. मूळ राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर या महिलेस अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्या तिघांनाही न्यायालयाने शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या सिनेमा दरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज...

रामकरण बन्सीधर योगी आणि दिलीप रामेश्वर योगी हे दोघेही राजस्थानचे आहेत. या दोघांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. तर मंगळवारी सकाळी सीमा दिलीप योगी या महिलेस अटक केली.

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एक महिलाही सामील

Image may contain: text that says

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आसाम येथील पीडित विवाहितेला तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला रामकरण योगी याच्याशी विवाह करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेवर आसामसह राजस्थान व कोल्हापुरात सामूहिक अत्याचार करण्यात आले. पाचगाव (ता. करवीर) येथे भाड्याने राहत असताना पीडित महिलेने रविवारी करवीर पोलिसांत अत्याचाराची तक्रार दिली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रामकरण बन्सीधर योगी आणि दिलीप रामेश्वर योगी हे दोघेही राजस्थानचे आहेत. या दोघांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. तर मंगळवारी सकाळी सीमा दिलीप योगी या महिलेस अटक केली.

Title: Mass atrocities on pregnant women A woman was arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे