सणसवाडीच्या उपसरपंच पदी निता हरगुडे

एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड

उपसरपंच पदासाठी निता संतोष हरगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे आणि सणसवाडी गावातील ग्रामस्थ व मान्यवर मंडळी तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करत त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिक्रापुर: सणसवाडी (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निता संतोष हरगुडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रमेश सातपुते होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी बी पवणे यांनी पाहिले.

यावेळी उपसरपंच पदासाठी निता संतोष हरगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे आणि सणसवाडी गावातील  ग्रामस्थ व मान्यवर मंडळी तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करत त्यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
 
"गावाने दिलेल्या संधीचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केला जाईल तसेच कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सोशल डिस्टन्स आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं" नवनिर्वाचित उपसरपंच नीता हरगुडे यांनी यावेळी सांगितल.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या,"सणसवाडी व परिसरातील युवकांसाठी औद्योगिक वसाहतीमध्ये संधी उपलब्ध असुन त्या मिळवून देण्यासाठी सर्ववतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपण सर्वांनी स्वतःची आणि आपल्या परिसराची कोरोनाच्या बचावासाठी काळजी घ्यावी तसेच सर्वांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे" अशी विनंती यावेळी त्यांनी ग्रामस्थांना केली.

Title: Nita Hargude as the Deputy Panch of Sanaswadi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे