अरे मी काम करु की सत्कार स्वीकारत फिरु...

अजित पवारांची कार्यकर्त्यांवर जोरदार 'फायरिंग'

राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी १० ते १२ गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजित पवारांचा पारा चढला. यावेळी मी सत्कार स्वीकारत बसलो तर काम कोण करणार, असे म्हणत कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.

पुणे: राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत गुंठेवारीचा निर्णय घेतला. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी १० ते १२ गावचे ग्रामस्थ आले होते. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आल्याने अजित पवारांचा पारा चढला. यावेळी मी सत्कार स्वीकारत बसलो तर काम कोण करणार, असे म्हणत कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले.

विक्रोळीत बाईकवर जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणांना बेड्या...

Image may contain: 1 person, text that says

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका बैठकांच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते. यावेळी कोणतीही पूर्व कल्पना न देता शेकडो कार्यकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित झाले. यावेळी पवार यांच्या शिस्तीच्या स्वभावाचं दर्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच घडले. पवारांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर ते खुपच चिडले. अरे मी काम करु की सत्कार स्वीकारत फिरु, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

सामुहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; अजित पवार

Image may contain: text that says

काही पुर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकर्‍यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचं संपुर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचं लक्षात आल्याने अजित पवारांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट फायरिंग सुरु केली. एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करु की सत्कार स्वीकारु...? असा सवाल अजित पवार यांनी केला. यावेळी काही गावकरीही तिथेही होते. त्यामुळे दादांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षा भंग झाला.

Image may contain: text that says

Title: Oh I will work to accept the hospitality
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे