आमचा विरोध हा विकासाला नसुन भ्रष्टाचाराला आहे; संजय पाचंगे

शिरुरच्या एस टी बसस्थानक बी ओ टी कामात मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे. तसेच या कामात अनेक त्रुटी असुन या सर्व कामाची माहिती ३ आठवड्यात जनतेसमोर ठेवावी, अन्यथा भाजपाच्या वतीने सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिरुर: शिरुरच्या एस टी बसस्थानक बी ओ टी कामात मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे. तसेच या कामात अनेक त्रुटी असुन या सर्व कामाची माहिती ३ आठवड्यात जनतेसमोर ठेवावी, अन्यथा भाजपाच्या वतीने सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

भाजपाकडून नुकसानग्रस्त गरीब कुटुंबांना मदतीचा हात

भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी बी ओ टी तत्वावर सुरु असलेल्या शिरुर बस स्थानकाच्या कामाबद्दल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, बारामतीचे बस स्थानक राज्य शासनाच्या निधीतून होते. तर शिरुर बस स्थानक बी ओ टी वर का? असा सवाल भाजपा उद्योगात आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला. भाजपाचे शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे, माजी शहर अध्यक्ष केशव लोखंडे, उमेश शेळके, विजय नरके, रेश्मा शेख या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

आमदाबाद अत्याचार प्रकरणाचा तपास संशयास्पद...?

शिरुर नगर परिषदेने बांधकाम परवानगी देताना भूखंडाचे क्षेत्र दोन २२१६८ चौरस मीटर इतके म्हटले आहे. त्यापैक २१ हजार ५०३ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र अनुज्ञेय केले आहे. त्यापैकी ५ हजार ९५५ चौरस मीटर इतके वाणिज्य साठी बांधकाम तर ३८४० चौरस मीटर रहिवासी बांधकाम एवढी परवानगी दिली असताना २१ हजार ६७९ चौरस मीटर क्षेत्र ठेकेदाराला बांधकाम व करारावर कसे देण्यात आले, असा सवालही पाचंगे यांनी उपस्थित करुन, यामध्ये शिरुर नगर परिषद, ठेकेदार व एसटी महामंडळ यांच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर एसटी महामंडळाने दाखवलेली जागा व बांधकाम परवानगी घेतलेली जागा यात तफावत असुन तहसीलदार शिरुर यांच्याकडील फेरफार क्रमांक ४६२६ नुसार सी.स.न. ११२८ अबकड, ११२९ पेटी, असे चित्र खरेदी दिले पण ते खरीदारी खरेदीदाराच्या नावावर नाही आणि जे नोंदले गेले आहे, त्याचे खरेदीखत झालेले नाही, असेही यावेळी पाचंगे यांनी सांगितले.

बंद असलेले विद्युत उपकेंद्र शासनाने ताब्यात घ्यावे; अरुण करंजे

शिरुर बसस्थानकाचा विकास करायचा या नावाखाली येथील जमिनीवर डोळा ठेवून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचा डाव असल्याचा आरोप संजय पाचंगे यांनी करुन, जवळपास यातील सर्वच कागदपत्रे चुकीची असुन शिरुर नगरपालिकेने दिलेली परवानगी ही चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिरुर नगर परिषदेकडे एसटी महामंडळाने ज्या जागेची परवानगी मागितली आहे. त्या जागेची परवानगी शिरुर नगरपरिषदेच्या वतीने दिली असुन रहिवासी क्षेत्रासाठी ३८४०.८१ चौ. मीटर व वाणिज्य क्षेत्रासाठी ५९५५ चौरस मीटर इतक्या जागेवर बांधकाम परवानगी दिली आहे. या जागेचा नकाशा व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडून तपासणी करुन घेतल्यानंतरच या बांधकामास परवानगी दिली असल्याचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

Title: Our opposition is not to development but to corruption Sanj
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे