रांजणगाव एमआयडीसी पर्यंत बस सुरू; वेळापत्रक पाहा...

रांजणगाव हे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असल्याने तसेच येथे पंचतारांकीत एमआयडीसी असल्याने स्थानिकांसह कामगार प्रवाशांची संख्या मोठी आहे.

रांजणगाव गणपतीः वाघोली ते रांजणगाव गणपती या मार्गावर १६१ क्रमांकाची बस सेवा दर अर्ध्या तासाला सुरु झाली. रांजणगाव एमआयडीसीतील शेवटच्या टोकातील जोटून कंपनीच्या गेटपर्यंत बस गेल्याने कामगारांनी आभार व्यक्त केले.

सरपंच पदाच्या आरक्षणाचा जिल्ह्यात सावळा गोंधळ

"बस पुणे स्टेशन पर्यंत जाणार असून एक प्रवाशास ६० रुपये तिकीट दर असल्याचे महिला वाहकांनी सांगितले. ही बस रात्री मुक्कामाला असून प्रवाशांनी सहकार्य करण्याची अपेक्षा महिला बस वाहकानी व्यक्त केली. "अनेक वर्षापासून पुणे ते रांजणगाव गणपती पर्यंत बस सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांची होती. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून बससेवा सुरु झाली असून, या बससेवेचा कामगार, महिला व इतर प्रवाशांना लाभ होणार आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; पाहा तारखा...

रांजणगाव हे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असल्याने तसेच येथे पंचतारांकीत एमआयडीसी असल्याने स्थानिकांसह कामगार प्रवाशांची संख्या मोठी आहे. बसमुळे आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे. पुण्यापासून रांजणगाव ५२ किलोमीटर असून, येथे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र आहे. रांजणगाव हे पर्यटन स्थळ असल्याने बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा उपयोग होणार आहे.

शिरूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहिर

वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
पुणे स्टेशन ते रांजणगाव एमआयडीसीपर्यत

सकाळी  ४:१०,४:४०,५:१० ५:४०,६:१०,६:४०,७:१०,७:४०,८:१०
दुपारी १:००,१:३०,२:००,२:३०,३:००,३:३०,४:००,४:३०,५:००,५:३०९:४५

वाघोली ते रांजणगाव एमआयडीसी पर्यत
सकाळी ८:१०,८:४०,९:१०,९:४०,१०:१०,१०:४०,११:१०,११:४०,
दुपारी १२:१०,१२:४५,५:३०,६:००,६:३०,७:००,७:३०,८:००,८:३०

रांजणगाव एमआयडीसी ते वाघोली पर्यंत
सकाळी ६:००,६:३०,७:००,७:३०,८:००,८:३०,९:००,९:३०,१०:००,१०:३५,
दुपारी ३:२०,३:५०,४:२०,४:५०,५:२०,५:५०,६:२०,६:५०,७:२५,८:००

रांजणगाव एमआयडीसी ते पुणे स्टेशन पर्यंत
सकाळी ९:४५,१०:२०,१०:५०,११:२०,११:५०,
दुपारी १२:२०,१२:५०,१:२०,१:५०,२:२५,७:१०,७:४५,८:१५,८:४०,९:१०,९:४०,१०:१०

सांग सांग भोलानाथ रेशनिंग दुकानांवर कारवाई होईल का...?

Title: pmpml bus start to pune station wagholi to ranjangoan midc
प्रतिक्रिया (3)
 
Vasantkoape
Posted on 6 January, 2021

Dhok sangvi pain chalu Kelli tar jamil steel Baja electrical emtect group antolin chya kamgarna fayda hoil ani dhoksangvi la fayda hoil.

प्रविण गोविंद जाधव
Posted on 19 December, 2020

रांजणगाव ते वाघोलि बस सकाळि 5 वाजता चालु झाली तर आम्हा ड्रायव्हर लोकांना कंपनीबस वरति जाण्यासाठी खुप मदत होईल

भरत मानकर
Posted on 14 December, 2020

आपली wab site अतिशय सुंदर आहे माहित सूदर आहे

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे