राजू शेट्टी भ्रमिष्ट झाले आहेत, सदाभाऊ खोत यांची टिका

जिथं जाईल तिथं पाठीत खंजीर खुपसायचा हाच त्यांचा उद्योग

जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहे', अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली.

कोल्हापुर: राजू शेट्टी यांचे सर्व कारनामे मला माहिती असुन त्यांच्यासारखी ३०० एकर जमीन कुठं घेऊन ठेवली नाही तसेच कार्यकर्त्यांच्या नावावर कुठंच पेट्रोल पंप  घेऊन ठेवले नाहीत, तसेच "राजू शेट्टी हा भंपक माणूस आहे. ते भ्रमिष्ठ झाले असुन गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहे', अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली.

राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. राजू शेट्टी हे पाय चाटण्यासाठी बारामतीला गेले, जिथं जाईल तिथं पाठीत खंजीर खुपसायचा असा त्यांचा उद्योग आहे, तसेच मी गेले अनेक वर्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर राजकारणात सोबत होतो त्याच्यामुळे राजू शेट्टी यांचे अनेक उद्योग मला माहीत आहे असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला.

 

 

 

Title: Raju Shetty is confused criticizes Sadabhau Khot
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे