राणा दग्गुबाती ८ ऑगस्टला अडकणार लग्नबेडीत

गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत झाला साखरपुडा

बाहुबली चित्रपटात भल्लालदेवच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राणा दग्गुबाती हे नाव चांगलेच चर्चेत आले.सध्या लग्नामुळे तो सातत्याने चर्चेत येत असतो.त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राणा दग्गुबातीने कुटुंबातील सदस्य व खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

मुंबई: बाहुबली चित्रपटात भल्लालदेवच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राणा दग्गुबाती हे नाव चांगलेच चर्चेत आले.सध्या लग्नामुळे तो सातत्याने चर्चेत येत असतो.त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राणा दग्गुबातीने कुटुंबातील सदस्य व खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

साखरपुड्यानंतर राणा दग्गुबाती आणि मिहिका लग्न कधी करणार हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.आता तो लग्नाच्या तयारीला लागला आहे.लग्नाच्या तारखेबद्दल राणा दग्गुबातीने सांगितले की, साखरपुड्यानंतर मी आणि मिहिका ८ ऑगस्टला लग्न करणार आहे.हा सोहळा खूप खासगी असेल आणि माझ्या जीवनातील सर्वात चांगला काळ असेल.

मिहिका बजाजचे कौतुक करत राणा दग्गुबाती म्हणाला की, माझे मिहिकावर खूप प्रेम आहे आणि आमच्या दोघांची जोडी खूप छान वाटते.मिहिका खूप सुंदर आहे.ती माझ्या फिलींग्स समजून घेते आणि याहून जास्त काय पाहिजे.मिहिका माझ्या घरापासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर आपल्या कुटुंबासोबत राहते.लॉकडाउनमध्ये जेव्हा आम्ही दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला.तेव्हा आम्हाला जास्त त्रास झाला नाही.त्यामुळे आता आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही.राणा दग्गुबातीनेअनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले, काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे खूप प्रेम मिळाले.

 

Title: Rana Daggubati will tie the knot with Mihika Bajaj on August
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे