आजचा वाढदिवसः डॉ. अंकुश लवांडे

डॉ. लवांडे हे रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असल्यापासून दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चांगली ओळख. दिलीप वळसे पाटील यांना सरांच्या प्रकृतीबाबत सांगितले. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी तत्काळ इंजेक्शन मिळवून देण्याची व्यवस्था केली.

ऑफिसवरून घरी आलो होतो. जेवण करून फेरफटका मारत असतानाच मित्र गणेश कुटे यांचा फोन आला आणि छातीत धस्स झालं. डॉ. अंकुश लवांडे सरांची तब्ब्येत अतिशय नाजूक असल्याचे त्यांनी सांगितले... डॉ. अंकुश लवांडे सरांसोबत तीन-चार दिवसांपूर्वीच सरांसोबत फोनवरून बोलणे झाले होते. अपघात झाला की काय? अशी शंका आली म्हणून विचारले तर नाही... सरांना कोरोना झाला आहे आणि प्रकृती फार बिकट आहे, असे गणेश यांनी सांगितले. कारण, कोरोणाच्या काळात परिस्थितीच तशी होती. काही करून आपल्याला एक इंजेक्शन हवे आहे, कुठे मिळते का पाहा... म्हणून त्यांनी सांगितले. व्हॉट्सऍपवर त्यांनी इंजेक्शनचे नाव पाठवले. सरांसाठी काही करून इंजेक्शन मिळवायचेच, या उद्देशाने घरातून बाहेर पडलो....

रात्रीची वेळ... रस्त्यांवरून फक्त रुग्णवाहिका धावत होत्या. रुग्णवाहिकेशिवाय दुसरे कोणी दिसत नव्हते. माझ्या जवळ ओळखपत्र असल्यामुळे मेडिकलच्या दिशेने निघालो. एक-दोन नव्हे तर शहरातील अनेक मेडिकल फिरलो. पण, इंजेक्शन काही मिळत नव्हते. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या अनेकांकडे चौकशी केली. काही वेळानंतर 'नाही' म्हणून मेसेज येऊ लागले. काय करावे, काही कळत नव्हते.... हतबल झालो होतो...

गणेश कुटे तर प्रचंड धावपळ करत होते. सरांची प्रकृती नाजूक असल्याचे त्यांनी घरी कोणाला सांगितले नव्हते. सरांना तर त्या इंजेक्शनची फार गरज होती. गणेश कुटे म्हणजे सकारात्मकतेचा झराच. कुठे ना कुठे मिळेल म्हणून जोरदार प्रयत्न करत होते. नको-नको ते प्रयत्न सुरू होते. आमचे फोनवरून बोलणे सुरूच... क्षणाक्षणाला सरांची प्रकृती नाजूक होत चालल्याचे समजत होते. काय करावे, काही कळत नव्हते. अखेर... मध्यरात्री गणेश यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना फोन केला. दिलीप वळसे पाटील यांनीही अनोळखी नंबर असला तरी उचलला...

डॉ. लवांडे हे रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असल्यापासून दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चांगली ओळख. दिलीप वळसे पाटील यांना सरांच्या प्रकृतीबाबत सांगितले. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी तत्काळ इंजेक्शन मिळवून देण्याची व्यवस्था केली. साधारण पहाटेच्या सुमारास इंजेक्शन प्राप्त झाले आणि सरांना ते देण्यात आले. तो पर्यंत धाक-धूक सुरूच होती. सरांची प्रकृती कशी आहे, असा मेसेज गणेश यांना केला... पण, उत्तर काही येत नव्हते. क्षणाक्षणाला मोबाईल तपासत होतो. सकाळी अकराच्या सुमारास गणेश यांचा मेसेज आला आणि सरांची प्रकृती सुधारल्याचे सांगितले. हुश्श्य.... मोठा दीर्घ श्वास सोडला... दुसऱया दिवसानंतर डॉ. लवांडे सरांची प्रकृती धोक्याबाहेर आली होती. डॉ. लवांडे सरांनी कोरोनावर मात केली होती. अक्षरशः मरणाच्या दारातून ते परत आले होते. काही दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. पण, त्यांच्यासोबत बोलणं होत नव्हते. मेसेज पाठवत होतो. एक दिवस सरांनी रिप्लाय दिला आणि आनंद वाटला.... सरांना भेटायचे होते, बोलायचे बोलायचे होते. पण, ती वेळच तशी होती की भेटताच येत नव्हते....

सरांना घरी सोडण्यात आले होते. महागणपतीचे आशिर्वाद, दिलीप वळसे पाटील यांनी औषध उपलब्ध करून दिल्यामुळे आणि सामाजिक, धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रात सरांनी केलेल्या कामांमुळे एक चमत्कार घडला होता. डॉ. लवांडे आणि गणेश कुटे यांच्यासोबत पुढील काळात फोनवरून बोलणे झाले. यावेळी सरांची प्रकृती किती भयानक होती हे समजले. सरांशेजारी असलेल्या 23 जणांना कोरोनाने 17 दिवसांमध्ये हिरावले होते. पण, सर संकटाचा सामना करत होते. कोरोनाला मोठ्या धाडसाने सामोरे जात होते...

काही झाले तरी कोरोनाला हरवणारच या ध्येयाने ते कोरोनाचा सामना करत होते. शेजारील रुग्णांपेक्षा माझी प्रकृती तर अतिषय बिकट होती. अहवालावरून तर दिसणारे चित्र भयानक होते. पण, काही असो, हरायचे नाही तर लढायचेच... हे ठरवले होते. रुग्णालयात 17 दिवस कसलाच झोपलो नव्हतो....९० टक्के आँक्सिजनवर सपोर्ट वर कसाबसा तग धरुन होतो. पण, हरलो नाही.... मरणाच्या दारातून परत आलोय... आता बोनस लाईफ आहे. यापुढेही असेच काम करत राहायचे, असे सर सांगत राहतात...

सर रुग्णालायत असताना त्यांच्या कुटुंबियांची अवस्था कशी असेल... पण, गणेश यांनी खरोखरच परिस्थिती हाताळली आणि त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले. डॉ. लवांडे सरांनी अतिशय गरिब परिस्थितीवर मात करून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. पुढे रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद भूषवले आहे. अनेक रुग्णांना जीवदान मिळवून दिले आहे. त्यांच्या विषयी कितीही लिहीले तरी कमीच आहे... अशा या आमच्या मित्राला... डॉ. लवांडे (मो. 93710 42792) सरांना... वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा....

डॉ. अंकुश लवांडे यांचा 21 वर्षांचा प्रवास थक्क करणारा...

Title: ranjangaon ganpati dr ankush lawande bithday and corona viru
प्रतिक्रिया (1)
 
Ankush
Posted on 13 January, 2021

अप्रतिम लेख

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे