निर्वीच्या सरपंचपदी ज्योती सोनवणे यांची निवड

शेतकरी कुटुंबातील महिलेला बिनविरोध पाठिंबा

निर्वी (ता. शिरुर) गावच्या सरपंचपदी शेतकरी कुटुंबातील ज्योती संतोष सोनवणे यांची निवड झाली असुन त्यांच्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना इतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना बिनविरोध पाठिंबा दर्शविला आहे.

शिंदोडी: निर्वी (ता. शिरुर) गावच्या सरपंचपदी शेतकरी कुटुंबातील ज्योती संतोष सोनवणे यांची निवड झाली असुन त्यांच्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना इतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना बिनविरोध पाठिंबा दर्शविला आहे.

सरपंचपदी विराजमान झाल्यावर ज्योती सोनवणे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीपणे काम सुरु केले असुन गावातील आशा वर्कर मार्फत प्रत्येक घरात कोरोनाविषयी जनजागृती तसेच मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे फायदे याविषयी गावातील ग्रामस्थांना सूचना दिलेल्या आहेत.

निर्वी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर जीर्णोद्धार, स्मशानभूमी सुशोभीकरण तसेच शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड. अशोकबापू पवार यांच्या प्रयत्नातून निर्वी-कोहकडेवाडी तसेच निर्वी-आंधळगाव रोड पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच गावातील सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदु मानुन गावाच्या विकासात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Title: Selection of Jyoti Sonawane as Sarpanch of Nirvi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे