शिक्रापूर पोलिसांनी मोटारीची तपासणी केली अन्...

शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत मोटारीसह देशी, विदेशी दारूचा साठा जप्त करतानाच एकाला अटक केली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत मोटारीसह देशी, विदेशी दारूचा साठा जप्त करतानाच एकाला अटक केली आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथून एक व्यक्ती चारचाकी गाडीतून दारूचे बॉक्स घेऊन जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलिस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हानंद पोवार, संदीप जगदाळे, अविनाश पठारे, विकास मोरे यांसह आदींनी सणसवाडी येथे जात सापळा रचला होता. त्यांना एम एच १२ आर एफ ३३०८ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट मोटार आढळून आली. एकाला ताब्यात घेत मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये देशी, विदेशी असे दारूचे सतरा बॉक्स असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी स्विफ्ट मोटारी दारूच्या बॉक्स सह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने विनोद यादव नाव असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदर दारू सणसवाडी येथीलच अमोल हंबीर याचेकडून आणण्याचे सांगितले.

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक ब्रम्हानंद पोवार रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विनोद आप्पा यादव (रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे) व अमोल हंबीर (रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.

Image may contain: text

Title: shirkrapur police arrested one person with car and liquor
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे