आजचा वाढदिवस: श्रीकांत निचित

वडनेर खुर्द, पत्रकार व कलाकार

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक अडचणी त्यांनी आपलया कलेद्वारे गोरक्षा ,पंचायत, रक्षिता, प्रेमवेडे ,खडा अश्या वेगवेगळ्या शाँर्ट फिल्मद्वारे युट्यूबवर मांडल्या आहेत. तसेच त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपलया कलेतुन २०१९ मध्ये केलेलया "बेवडा आशिक" या वेबसिरीजला पण प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

शिरुर तालुक्यातील वडनेर खुर्द छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या श्रीकांत निचित यांना लहानपणापासुन कलेची आवड होती पण योग्य मार्ग मिळत नव्हता. २०१५ पासुन त्यांनी या क्षेत्रात छोटी छोटी कामे करायला चालु केल्यानंतर घरुन या क्षेत्रात काम करायला पुर्ण विरोध असतानाही त्यांनी या क्षेत्रात काम करायला चालू  केले. पहील्यांदा शिकण्यासाठी त्यांनी छोटे छोट्या शाँर्ट फिल्म मध्ये काम चालु केल्यानंतर २०१८ मध्ये आणि सध्या गाजत असलेलया शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा विषय आणि याच विषयाला अनुसरुन "वैताग" या वेबसिरीजची निर्मिती केली. या वेबसिरीजचे १४ भाग "युट्युब" वर आजही लोकप्रिय आहेत. त्याचे काही व्हिडीओ त्यावेळेस खुप गाजले होते.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक अडचणी त्यांनी आपलया कलेद्वारे गोरक्षा ,पंचायत, रक्षिता, प्रेमवेडे ,खडा अश्या वेगवेगळ्या शाँर्ट फिल्मद्वारे युट्यूबवर मांडल्या आहेत. तसेच त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपलया कलेतुन २०१९ मध्ये केलेलया "बेवडा आशिक" या वेबसिरीजला पण प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. भविष्यात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी रुपेरी पडद्यावर व सोशल मिडीया माध्यमातून मांडण्याचा त्यांचा मानस आहे. कलेबरोबरच त्यांना पत्रकारितेची आवड आहे. आपलया परीसरात घडणाऱ्या अनेक "बातम्या" लोकांच्या समोर यायला पाहिजे. म्हणुन ते नेहमीच प्रयत्नशील असतात. गेल्या ३ वर्षांपासून पत्रकारीतेच्या माध्यमातून ते समाज्यातील विविध प्रश्नांवर ते नेहमीच लिखाण करत असतात.

शब्दांकन: तेजस फडके 

Title: shirur taluka celebrate Shrikant Nichit birthday
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे