...म्हणून मोटार बांधली झाडाला!

काळ्या रंगाची स्कॉर्पिओ साखळीच्या साहाय्याने झाडाला बांधून ठेवली आहे. छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक यावर भन्नाट कमेंट्स नोंदवत आहेत.

नवी दिल्ली: एका व्यक्तीने आपली स्कॉर्पिओ मोटार चोरीला जाऊ नये म्हणून चक्क झाडाला बांधून ठेवली आहे. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. शिवाय, आश्चर्यचकीत होत आहेत.
 
'महिंद्रा ऍण्ड महिंद्रा' ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी संबंधित छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्र सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. चोरीच्या भितीने काळ्या रंगाची स्कॉर्पिओ साखळीच्या साहाय्याने झाडाला बांधून ठेवली आहे. छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक यावर भन्नाट कमेंट्स नोंदवत आहेत.

स्कॉर्पियोच्या गाडीला लॉक करण्यासाठी हायटेक सोल्यूशन नाही असे गृहित धरलं तर लॉकडाऊनमध्ये मी कसे याकडे पाहात होतो. आता याची साखळी काढून मास्क लावून मी विकेण्डचा प्लॅन करणार असल्याचं आनंद महिंद्रा यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. हत्ती सारख्या गाडीला एवढी मोठी सुरक्षा हवी,  ही गाडी चोरणं खूप सोपं आहे, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

Title: shirur taluka news anand mahindra share scorpio photo
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे