न्हावरे येथील क्रौर्याची परिसिमा गाठणारा नराधाम अटकेत

न्हावरे येथे पीडित महिला बाथरुमला गेली असताना अज्ञात व्यक्तीने पीडित महिलेची छेड काढून मारहाण केली होती. शिवाय, दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा केली होती.

शिरुर (पुणे): शिरुर तालुक्यात महिलेवर हल्ला करुन डोळा निकामी करुन पसार झालेल्या नराधमास अखेर पुणे ग्रामीण पोलिसांना अथक परिश्रमानंतर गजाआड करण्यात यश आले आहे. कुंडलिक साहेबराव बगाडे (रा. उंडवडी, ता.बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

माझे डोळे परत द्या; मी त्या नराधमांना ओळखेन...

सविस्तर असे कि, तीन नोव्हेंबर रोजी न्हावरे येथे पीडित महिला बाथरुमला गेली असताना अज्ञात व्यक्तीने पीडित महिलेची छेड काढून मारहाण केली होती. शिवाय, दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा केली होती. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घडल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपासाची चक्रे फिरवली.

शिरूरमधील महिलेवरील हल्ल्याचे राज्यभर पडसाद...

दरम्यान घटनेची गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगाने तपास सुरु करत न्हावरे येथून तपास सुरु केला. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, यवत, बारामती, इंदापुर त्याचप्रमाण पुणे ग्रामीणच्या तपास यंञणा वेगाने आरोपीच्या शोधार्थ रवाना झाल्या. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख हे सलग पाच दिवस तपास यंञणांना सुचना देत न्हावरे येथे तळ ठोकून होते.

शिरूर तालुक्यात महिलेवर जीवघेणा हल्ला...

दरम्यान, पोलिसांची तपास पथके शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे राजू मोमीण यांना आरोपी बाबत चायनिज सेंटर मध्ये काम करत असल्याबाबत माहिती मिळाली. सदर आरोपीने डोक्यावरील केस व दाढी काढले असल्याची व महिलेने दिलेले वर्णन मिळते जुळते असल्याबाबत खाञी झाली. या माहितीच्या आधारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाला गती देत आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीच्या हातात शंकराची पिंड आहे. व्यक्तीचा रागीट स्वभाव आहे. भिक मागत फिरतो व सतत नशेत असतो, मुका असल्याचे ढोंग करतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंञणा, सोशल मिडिया, व्हॉट्सअपद्वारे सीसीटिव्ही फुटेज मधील संशयिताचा फोटो व माहिती प्रसारित केली. त्यानुसार कुंडलिक साहेबराव बगाडे (रा. उंडवडी, ता.बारामती) असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु ठेवला.

न्हावरे प्रकरणातील आरोपी तत्काळ अटक करा; तृप्ती देसाई

दरम्यान, आज (सोमवार) शिक्रापूर मधील चाकण चौकात पोलिस निरीक्षक उमेश तावस्कर, सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलिस नाईक हरिष शितोळे यांना आरोपीची माहिती मिळाल्यानंतर ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांची संयमाची परिक्षा घेणारा आगळा वेगळा तपास
पुणे जिल्हयातील न्हावरे गावात गरीब कुटुंबातील महिलेवर आरोपीने अत्यंत क्रुरतेने हल्ला केला होता. यात महिलेचे डोळे निकामी झाले आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत गंभीर व संवेदनशील गुन्हा असल्याने पोलिसांसमोर शोध लावणे हे मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनीधींकडून आरोपीस अटक करण्याची मागणी केली जात होती. तपास लावताना कुठलाही पुरावा नसल्याने शोध घेणे पोलिसांसमोर मोठे अडथळे होते. माञ, पोलिसांनी कसून तपास करत अखेर आरोपीस गजाआड़ केले आहे.

एका आरोपीच्या शोधासाठी प्रचंड फौजफाटा
प्रकरणाचे गांभिर्य मोठे असल्याने  पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट, शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, भिगवणचे सहा. पोलिस निरीक्षक जीवन माने, बारामतीचे सहा.पोलिस निरीक्षक लंगोटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिक्रापूरचे पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, यवतचे पोलिस उपनिरीक्षक गंपले, पोलिस उपनिरीक्षक सुनिल मोटे, पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे, दौंड पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक अमृता काटे यांसह पोलिस कर्मचारी सलग सहा दिवस (दिवस राञ) कुठलीही विश्रांती न घेता तपास करत अखेर आरोपीला गजाआड करण्यात यश आले.

तपास पथकातील पोलिसांचे नागरिकांकडुन अभिनंदन
पुणे ग्रामीण पोलिसांनी अहोराञ मेहनत घटनेतील गांभिर्य ओळखुन आरोपीला अटक केल्यानंतर शिरुर तालुक्यातील नागरिकांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Title: shirur taluka news navhare women attacked arrested police
प्रतिक्रिया (2)
 
Rohidas Pandurang Borhade
Posted on 9 November, 2020

I am proud of you...

रोहित रामराव भोसले
Posted on 9 November, 2020

प्रति. मी रोहित रामराव भोसले पत्ता. सुनंदा भोसले नगर मांडवगण फराटा मध्ये माझे काम आहे समाज कार्य करतो

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे