...म्हणून जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला ठोकला राम राम

मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवार (दि. १७) रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबई: मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवार (दि. १७) रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिरुर तालुक्यातुन शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कतील स्मृती स्थळावर अभिवादन केले. त्यानंतर वार्ताहरांना बोलताना त्या म्हणाल्या, जयसिंगराव गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, तरीसुद्धा ते भाजप सोडून गेले. पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल, असे मत त्यांनी मांडले.

लोणीकाळभोर, लोणीकंद पोलिस ठाणी अद्याप ग्रामीणमध्येच

दरम्यान, मराठवाडा पदवीधर निवडणूक लढण्यासाठी भाजपकडून जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी निश्चित केली. म्हणून गायकवाडांनी बंडखोरी करत पक्ष उमेदवार अर्ज भरला होता. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाच, शिवाय भाजपलाही राम राम ठोकला.

शरद पवार आईच्या आठवणीने भारावले...

मुंडे-ठाकरे कुटुंबांचे जुने संबंध
बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मनात आदरच्या भावना आहेत. स्मृती स्थळ असल्याने अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबीयांसाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते. अन्य अनेक पक्षातही असे संबंध असतात,' असे त्यांनी सांगितलं.

Title: So Jaysingrao Gaikwad beat BJP Ram Ram
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे