निष्क्रीय राहून बोलणं म्हणजे आत्मपरिक्षण नसतं तर...

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निराश कामगिरीबाबत कपिल सिब्बल यांनी अलिकडेच एका मुलाखतीत करडे बोल ऐकवले होते. स्वत:च्याच पक्षातील आत्मपरिक्षणाबाबतच्या विदारक परिस्थितीबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली होती.

कोलकाता: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निराश कामगिरीबाबत कपिल सिब्बल यांनी अलिकडेच एका मुलाखतीत करडे बोल ऐकवले होते. स्वत:च्याच पक्षातील आत्मपरिक्षणाबाबतच्या विदारक परिस्थितीबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली होती. यावर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. स्वत: काहीच न करता नुसतंच बोलणं म्हणजे आत्मपरिक्षण नसतं, अशी परखड टीका चौधरी यांनी केली आहे.

...म्हणून जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला ठोकला राम राम

कपिल सिब्बल यांनी अलिकडेच काही विधाने केली आहेत. ते काँग्रेसबाबत फारच चिंतेत दिसत आहेत आणि आत्मपरिक्षणाची गरज व्यक्त करत आहेत. पण बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश वा गुजरात निवडणुकीत कुठेही आम्ही त्यांचं तोंड देखील पाहिलं नाही. पुढे त्यांनी म्हटलंय की, कपिल सिब्बल बिहार किंवा मध्य प्रदेशला गेलेले? जर ते गेले असते आणि काँग्रेसची स्थिती मजबूत केली असती, तर ते जे बोलत आहेत ते बरोबर ठरलं असतं. नुसत्या बाता मारण्याने काहीही साध्य होणार नाही. काहीच न करता निव्वळ बोलण्याने आत्मपरिक्षण होत नाही, अशी खोचक टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली.

...त्यावेळी मला विधानपरिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं

सिबल यांनी म्हटलं होतं की, काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या समस्या आणि त्यांची उत्तरे माहित आहेत, पण काँग्रेसला ती उत्तरे शोधायच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना ओळखायचेच नाही. आमच्यातील काहींनी आमचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी आमच्याकडे पाठ फिरवली. आणि आपण सगळे त्याचे परिणाम पाहतोय. फक्त बिहारमधीलच नव्हे, तर देशातील लोक जिथे कुठे पोटनिवडणुका होतात तिथे सुद्धा काँग्रेसला एक चांगला पर्याय म्हणून पाहत नाहीत. गुजरातच्या पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसला पराभव बघायला लागला. तीन ठिकाणी उमदेवारांचे डिपॉझीट जप्त होण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतही असेच घडले. देशातील लोक आपल्याकडे सक्षम पर्याय म्हणून पाहतच नसल्याचे दिसून येतंय, असं त्यांनी म्हटलंय.

ठाकरे कुटुंबासोबत अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले

याआधी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, माजी केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने पक्षाच्या अंतर्गत असलेल्या बाबींना असं मीडियामध्ये आणणे चुकीचे होते यामुळे त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असे म्हणत त्यांनी सिब्बल यांना लक्ष्य केले होते.

Title: Talking while inactive is not introspection
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे