'फायटर'मध्ये प्रथमच झळकणार हृतिक सोबत ही अभिनेत्री

बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनचा गतवर्षी प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर धम्माल केली होती. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत टायगर श्रॉफची जोडी चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटानंतर हृतिकने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. पण आता त्याने 'फायटर' नावाचा आणखी एक ऍक्‍शन चित्रपट साइन केला आहे.

मुंबई: बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनचा गतवर्षी प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर धम्माल केली होती. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत टायगर श्रॉफची जोडी चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटानंतर हृतिकने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. पण आता त्याने 'फायटर' नावाचा आणखी एक ऍक्‍शन चित्रपट साइन केला आहे. हृतिकच्या 'वॉर' आणि 'बॅंग बॅंग'सारख्या सुपरहिट ऍक्‍शन चित्रपट बनवणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.

Image may contain: 1 person, text that says

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार जोरात

'फायटर' चित्रपटासाठी हृतिकच्या आपोझिट दीपिका पदुकोणला कास्ट करण्यात आले आहे. या चित्रपटात हृतिक रोशन एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. मात्र, अद्याप दीपिकाच्या व्यक्तिरेखेविषयी काहीही सांगण्यात आले नाही. २०२१ च्या डिसेंबरपासुन चित्रपटाचे शूटिंग सुरु होऊ शकते.

Image may contain: text that says

...म्हणुन राहिले त्याच ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचं स्वप्न अधुरं

दरम्यान, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची जोडी एकत्र पाहण्याची चाहत्यांची अनेक वर्षांपासुन इच्छा आहे. आता ती लवकरच पूर्ण होणार आहे, तेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. हा चित्रपट २०२२ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरु शकतो. दुसरीकडे दीपिकाबद्दल सांगायचे झाल्यास ती अखेरच्या वेळी 'छपाक' चित्रपटात झळकली होती. सध्या ती शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटात काम करत आहे.

Image may contain: text that says

Title: The actress will be seen for the first time in Fighter wit
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे