आळंदीत पहिले शाहिरी व लोककला संमेलन संपन्न...
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे यांच्या वतीने कासार धर्मशाळा आळंदी येथे २ दिवसांचे पहिले 'शाहिरी व लोककला संमेलन' संपन्न झाले. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदाच हे संमेलन घेण्यात आले.आळंदी: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे यांच्या वतीने कासार धर्मशाळा आळंदी येथे २ दिवसांचे पहिले 'शाहिरी व लोककला संमेलन' संपन्न झाले. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पहिल्यांदाच हे संमेलन घेण्यात आले.
कॅनॉल मध्ये पडुन आजोबा व नातीचा दुर्देवी मृत्यु
शाहिरी व लोककलांना उर्जितावस्था प्राप्त करुन देऊन या कलांना जुने वैभव प्राप्त करुन देण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी कार्यरत असुन लोककलावंतांना व लोककलेला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या विषयावर चिंतन, मनन व्हावे म्हणुन शाहिरी व लोककला संमेलन घेण्यात आले.
आजचा वाढदिवसः डॉ. अंकुश लवांडे
यावेळी बालशाहीर सक्षम जाधव याने शाहिरी गण व बालशाहीरा निर्झरा उगले हिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा सादर केला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ह.भ.प. अभय महाराज नलगे यांनी वारकरी कीर्तन केले. संध्याकाळच्या सत्रात पुण्यातील प्रख्यात तबलावादक संजय करंदीकर यांनी 'महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीतील तालवाद्ये' या विषयावर सप्रयोग व्याख्यान दिले.