संग्राम घोडेकर यांच्या मुख्य मारकऱ्यांना अवघ्या तीन दिवसांत अटक

नारायणगाव येथील कोल्हे मळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्या कुविख्यात गुंड गणेश रामचंद्र नाणेकर यांस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. या घटनेतील मुख्य आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हा पोलिसांच्या ताब्यात घेतले.

नारायणगाव: नारायणगाव येथील कोल्हे मळा चौकात संग्राम घोडेकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्या कुविख्यात गुंड गणेश रामचंद्र नाणेकर यांस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. या घटनेतील मुख्य आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे हा पोलिसांच्या ताब्यात असुन ह्या प्रकरणात सुपारी घेणारा गणेश नाणेकर रा .नाणेकर वाडी, चाकण, अजय उर्फ सोन्या राठोड (वय २३) रा १४ नंबर तसेच खबऱ्या संदीप बाळशीराम पवार (वय २०) रा पिंपळवंडी ता जुन्नर व २ अल्पवयीन हल्लेखोर यांस पोलिसांनी चाकण येथून ताब्यात घेतले असुन दुसरा सूत्रधार प्रशांत माने हा फरार आहे.

सामाजिक कार्यकर्ते असलेल्या एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला...

Image may contain: 1 person, text that says

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जानेवारी रोजी संग्राम घोडेकर याच्यावर हल्ला करुन फरार झालेले २ अल्पवयीन गुन्हेगार व अजय उर्फ सोन्या राठोड हे अलिबाग या ठिकाणी वास्तव्यास होते. या घटनेतील दुसरा सूत्रधार प्रशांत माने व सुपारी किंग गणेश नाणेकर या दोघांची पुर्वीची मैत्री होती. त्यांनी शेखर कोऱ्हाळे यांच्याबरोबर डिसेंबर २०२० मध्ये या हल्ल्याबाबतचा प्लँन केला होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यावर जामीन लवकर होऊन मुलांना सोडवता येईल म्हणुन त्यांनी त्या घटनेत अल्पवयीन मुलांचा वापर करायचा ठरवल. त्यानुसार गणेश नाणेकर याने सुपारी घेऊन ही जबाबदारी सोन्या राठोडवर सोपवली. गणेश नाणेकर यावर विविध पोलीस ठाण्यात शरीराला अपाय करण्याबाबतचे व इतर गंभीर गुन्हे तर हल्लेखोर अजय उर्फ सोन्या राठोड याच्यावर चोरी, अपहरण करुन खून करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

Image may contain: text that says

७ जानेवारी रोजी हल्ला करण्यापुर्वी या गुन्ह्यातील संदीप पवार हा संग्राम घोडेकर यांच्यावर पाळत ठेवून होता. त्यानुसार पवार यांनी अजय उर्फ सोन्या राठोडला संग्राम घोडेकर यांच्या हालचालीची माहिती देऊन सोन्या राठोड याने २ अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन संग्राम घोडेकर यांच्यावर कोल्हे मळा येथे कोयत्याने  हल्ला केला. या हल्ल्यानंतर नारायणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नारायणगाव पोलिसांनी या घटनेनंतर मुख्य सूत्रधार चंद्रशेखर को-हाळे यास अवघ्या ६ तासाच्या आत ताब्यात घेतले व पुढील गुन्हेगार लवकरच शोधून काढू असा शब्द सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी ग्रामस्थांना दिला होता. त्यानुसार ३ दिवसाच्या आत यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नारायणगाव ग्रामस्थांमधून या अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

...म्हणुन भावानेच केला भावाचा खून

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक गुलाब हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पालवे, पोलीस शिपाई सचिन कोबल, शैलेश वाघमारे, शाम जायभाय, संतोष साळुंखे, योगेश गारगोटे यांच्या पथकाने केली.

Image may contain: text that says

Title: The main killers of Sangram Ghodekar were arrested in just t
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे