युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा; गणेश बांगर
युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन प्रा. गणेश बांगर यांनी केले.तळेगाव ढमढेरे: युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन प्रा. गणेश बांगर यांनी केले.
शिक्रापुरात मतदानासाठी वार्डानुसार जागेचे विभाजन
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रा. बांगर बोलत होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ललितकुमार इंगवले, प्रशासकीय अधिकारी पी. सी. जाधव, डॉ. विजय गायकवाड, पूजा काटे, विकास आंधळे, मेघा गरुड, प्रज्ञा खोदडे, रोहिणी जऱ्हाड, मुक्ता मापारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय गायकवाड यांनी केले तर प्रिती पवार यांनी आभार मानले.