या अभिनेत्रीच अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचं स्वप्न होणार पूर्ण

बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण ही जोडी अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. 'मेजर साहब', 'खाकी', 'सत्याग्रह' हे त्यातलेच काही सिनेमे जे चाहत्यांच्या लक्षात असतील.

मुंबई: बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण ही जोडी अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. 'मेजर साहब', 'खाकी', 'सत्याग्रह' हे त्यातलेच काही सिनेमे जे चाहत्यांच्या लक्षात असतील.

अभिनेता प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर...

आता पुन्हा एकदा अजय देवगण आणि 'बिग बी' म्हणजेच अमिताभ बच्चन 'मेडे' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. जवळपास ७ वर्षानंतर मेडे या सिनेमासाठी ही जोडी एकत्र आली आहे. विशेष म्हणजे या सिनेमात 'बिग बी' आणि अजय देवगण सोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंह देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात रकुल एका महिला वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. अजय देवगण 'मेडे' या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असुन तो या सिनेमात मुख्य भूमिका देखील साकारणार आहे. त्याच्या सोबतच बिग बी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर मध्ये या सिनेमाचं हैदराबादमध्ये शूटिंग करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

अभिनेत्री कमल ठोके यांच्या निधनानंतर 'अज्या'ची भावनिक पोस्ट...

रकुलने याबाबत बोलताना सांगितलं आहे की, तिने या आधी देखील अजय सोबत काम केलं आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्यासाठी ती खूप उत्साही आहे. तीने म्हटलंय की ''या सिनेमाच्या निमित्ताने 'बिग बीं' सोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. ''

 

Title: This actress will fulfill her dream of working with Amitabh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे