ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीसाठी असणार ही अट...

राज्यातील मुदत संपलेल्या आणि डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या १४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणार्‍या प्रशासक पदासाठी सातवी उत्तीर्ण अशी अट असणार आहे.तसेच विद्यमान सरपंच किंवा सदस्यांना प्रशासक पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

मुंबई: राज्यातील मुदत संपलेल्या आणि डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या १४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींवर नेमण्यात येणार्‍या प्रशासक पदासाठी सातवी उत्तीर्ण अशी अट असणार आहे.तसेच विद्यमान सरपंच किंवा सदस्यांना प्रशासक पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

राज्यातील १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून २०२० दरम्यान समाप्त झाली आहे.तर १२६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपत आहे.अशा १४२३४ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.संबंधित जिल्हा पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाला महाराष्ट्र सरपंच परिषदेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.न्यायालयाने जेथे शक्य आहे तेथे प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी नेमण्यास सांगितले आहे.सरकारी अधिकारी उपलब्ध नसल्यास खासगी व्यक्तीची नेमणूक करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने प्रशासक पदासाठी कार्यपद्धती तयार केली आहे.

ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे.या कार्यपद्धतीची माहिती आज उच्च न्यायालायला सादर करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रशासकपदासाठी आवश्यक अटी:
१) प्रशासक संबंधित गावातील रहिवाशी असावा.
२) प्रशासकाला कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली नसावी.
३) गावकर्‍यांचा आक्षेप असेल तेथे सरकारी अधिकारी नेमण्यात येईल.
४) सरकारी अधिकारी उपलब्ध असल्यास त्यांना प्रशासक म्हणून नेमले जाईल.

Title: This condition will be for the appointment of Gram Panchayat
प्रतिक्रिया (1)
 
ज्ञानोबा विक्रमराव पुंडे
Posted on 7 August, 2020

शक्य तो शिक्षक प्रशासक असला तर त्यांना जास्त कामकाजाविषयी सांगण्याची गरज लागणार नाही ग्रामपंचायत कामकाज निश्चित उत्तम पद्धतींनी चालेल

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे