एका नवऱयाच्या तीन बायका राहतात एकत्र अन्...

लग्नासंदर्भात एक म्हण आहे. शादीका लड्डू जो खाए वो पचताये और जो ना खाये वो भी पचताये. उत्तर प्रदेशात असाच एक अनोखा प्रकार घडला आहे. एका नवऱयाच्या तीन बायका अगदी गुण्या-गोविंदाने नांदत आहेत.

लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवऱयाच्या तीन बायका असून, चौघेही एकमेकांवर प्रेम करतात. तिघीही नवऱयाला दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे 12 वर्षांपूर्वी एकाच मंडपात तिघींनी त्याच्याशी विवाह केला होता.

शिरूर तालुक्यात तीन बायका अन् फजिती ऐका...

लग्नासंदर्भात एक म्हण आहे. शादीका लड्डू जो खाए वो पचताये और जो ना खाये वो भी पचताये. उत्तर प्रदेशात असाच एक अनोखा प्रकार घडला आहे. एका नवऱयाच्या तीन बायका अगदी गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. चित्रकूट येथे राहणारे कृष्णा यांच्यासाठी करवाचौथचा सण दरवर्षी अधिक आनंद घेऊन येतो. या दिवशी त्यांच्या तीन पत्नी करवाचौथचा उपवास करतात. आणि पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करतात. कृष्णा यांच्या तीन पत्नी शोभा, रीना आणि पिंकी या सख्ख्या बहिणी आहेत. 12 वर्षांपूर्वी एकाच मंडपात तिघींनी कृष्णाशी विवाह केला होता.

तीन बायका अन् फजिती ऐका प्रकरण मिटवायला निघालेत गावकारभारी...!

करवाचौथच्या दिवशी तिघींनी एकत्रित उपवास केला. पूजा-अर्चा केली आणि चंद्राला अर्ध्य देत नवऱयाचे औक्षण केले. तिघी बहिणी एकाच घरात राहतात. शोभा, रीना आणि पिंका तिघींनी बुंदेलखंड विद्यापीठातून एमएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आमचे पती राजा दशरथ असून, आम्ही त्यांच्या राणी आहोत. तिघी पत्नींपासून कृष्णाला दोन-दोन मुलेही आहेत. हे सर्वजण काशीराम कॉलनी येथे राहतात.

सलमान आणि ऐश्वर्या या दोघांचा असा झाला होता ब्रेकअप

एका नातेवाईकाने सांगितले की, 'तिघीही शिक्षित आहेत आणि आपल्या मुलांना चांगल्या वातावरणात वाढवू इच्छितात. हे लग्न इतके वर्ष चालेल याची आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून सर्वजण एकत्र आहेत. कृष्णाने तिघी बहिणींसोबत एकाच मांडवात का लग्न केले याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही.'

Title: three wife and one husband live together at uttar pradesh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे