दुचाकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील काजू फॅक्टरी समोर भरधाव वेगात असलेल्यालेल्या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला.तळेगाव ढमढेरे: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील काजू फॅक्टरी समोर भरधाव वेगात असलेल्यालेल्या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला.
पुणे-नगर महामार्गावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या ऊस वाहतूक
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील स्वरुप कॅशु या काजू फॅक्टरी समोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात हर्षद दत्तात्रय चव्हाण (वय २१) रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर) व अंकुश बाप्पू चोरमले (वय २५) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) या २ युवकांचा मृत्यू झाला.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार जोरात
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यावरील निमगाव म्हाळुंगी फाट्यापासुन १ किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वरुप कॅशु या काजू फॅक्टरी समोर सायंकाळी ६.३० वाजलयाच्या सुमारास भरधाव चाललेल्या दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन अपघात झाला. त्यामध्ये दोघेही युवक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र अपघातात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
एका युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारा हिरा हरपला...
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील हर्षद दत्तात्रय चव्हाण या युवकाने कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक घरोघरी जाऊन सॅनिटायझर व मास्कचे वाटप करत कोरोना योद्धा म्हणुन कामगिरी बजावली. तसेच दिवाळी मध्ये 'एक दिवा सैनिकांसाठी' या सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपली होती. गरीब कुटुंबातील एकुलता एक मुलगा हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.