शिक्रापुरात मतदानासाठी वार्डानुसार जागेचे विभाजन

तीन शाळेमध्ये होणार ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान नेहमी जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असताना सध्याच्या वाढत्या मतदार संख्येमुळे मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी वार्डनिहाय मतदान ठिकाणाचे विभाजन करण्यात आले असल्याची माहिती तलाठी अविनाश जाधव यांनी दिली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान नेहमी जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असताना सध्याच्या वाढत्या मतदार संख्येमुळे मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी वार्डनिहाय मतदान ठिकाणाचे विभाजन करण्यात आले असल्याची माहिती तलाठी अविनाश जाधव यांनी दिली आहे.

संग्राम घोडेकर यांच्या मुख्य मारकऱ्यांना अवघ्या तीन दिवसांत अटक

Image may contain: text that says

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतसाठी गावातून १४ हजार २२५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असुन प्रत्येक निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असुन मतदारांना मतदान करणे सोपे जावे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये होणाऱ्या मतदानाचे विभाजन करण्यात आले.

शिक्रापूरात रंगू लागले पोलीस निरीक्षकांबाबतचे तक्रार नाट्य

गावातील वार्ड क्रमांक १ व २ चे मतदान शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेमध्ये होणार असुन वार्ड क्रमांक १ मधून २६७९ तर वार्ड क्रमांक २ मधून ३४४६ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे, तर वार्ड क्रमांक ३, ५ आणि ६ चे मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे होणार असुन वार्ड क्रमांक ३ मधून २४९१ तर वार्ड क्रमांक ५ मधून २१४९ आणि वार्ड क्रमांक ६ मधून १७८० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. तसेच वार्ड क्रमांक ४ चे मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे होणार असुन वार्ड क्रमांक ४ मधून १६८० मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे, तरी सर्व मतदार आणि ग्रामस्थांनी याची नोंद घेण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र प्रथमच मतदारांच्या मतदान ठिकाणाचे विभाजन झाले असल्याने मतदारांचा मोठा गोंधळ उडणार आहे.

Image may contain: text that says

Title: Ward wise division of seats for polling in Shikrapur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे