कोरोना बाबत काय म्हणतात ज्योतिषी आणि ज्योतिषशास्र...?
नोव्हेंबर महिण्याअखेर कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता
कोरोनवर लस कधी येते याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो मृत्यू होत आहेत. तर लाखो लोक कोरोनाग्रस्त झालेले आहेत. ज्योतिष विशारद निलेशकुमार यांनी सांगितलेल्या या भविष्यवाणीवरून नोव्हेंबर महिण्याअखेर ही महामारी जाईल आणि पुन्हा सर्व जग पूर्वपदावर येईल असे वाटते.रांजणगाव गणपती: देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊन वाढवले असले, तरीही काही प्रमाणात शिथिलता ही केलेली आहे. दरम्यान कोरोनवर लस कधी येते याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो मृत्यू होत आहेत. तर लाखो लोक कोरोनाग्रस्त झालेले आहेत. ज्योतिष विशारद निलेशकुमार यांनी सांगितलेल्या या भविष्यवाणीवरून नोव्हेंबर महिण्याअखेर ही महामारी जाईल आणि पुन्हा सर्व जग पूर्वपदावर येईल असे वाटते.
भारतात एकूण १०,३२,६९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ६.३६ लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र २६२०८ रुग्णांचा या कोरोना महामारीने भारतात मृत्यू झालाय. त्यामुळे ही महामारी जगासह भारतातून कधी जाईल याची सर्वांना चिंता लागली आहे. जगातले शास्त्रज्ञ यावर अहोरात्र काम करत आहे.हि महामारी जाणार कधी आणि याचा ज्योतिषी अभ्यासातून विश्लेषण ज्योतिष विशारद निलेशकुमार गायखे यांनी सांगितले आहे.
मेदिनीयज्योतिष्य शास्रीय पद्धतीने विचार करिता, कोरोना या संसर्गजन्य आजाराचा संबध सध्या मिथुन राशीतील राहुशी आहे. राहूचा राशी बदल झाल्यावर कोरोनाचा शेवट होण्यासाठी महत्त्वाचा राहील. सध्या मकर राशीतील शनि व मिथुनेतील राहु चा षडाष्टक योग आहे. १९ सप्टेंबर २०२० रोजी राहू मिथुन राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर खऱ्या अर्थाने कोरोनाचा शेवट होईल अशी शक्यता वाटते. सध्या तरी गुरु महाराज स्वराशीत म्हणजे धनु राशीत परतल्याने दिलासा मिळेल. १९ सप्टेबर ते ३० नोहेंबर या कालावधी नंतर कोरोनाच्या या मगरमिठीतुन बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारी लस उपलब्ध होईल असे तरी प्राथमिक अंदाजावर वाटत आहे.तरी ज्योतिष विशारद निलेशकुमार यांनी सांगितलेल्या या भविष्यवाणीवरून नोव्हेंबर महिण्याअखेर ही महामारी जाईल आणि पुन्हा सर्व जग पूर्वपदावर येईल असे वाटते. शासनाचे नियम सर्वांनी पाळावेत हीच विनंती.
शब्दांकन:- निलेशकुमार गायखे (रांजणगाव गणपती)
मो ९६३७८८८८००