गावातील निवडणूक बिनविरोध का झाली नाही...?
राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचार संहिताही लागू झाली आहे. तर ४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असुन सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.अहमदनगर: राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचार संहिताही लागू झाली आहे. तर ४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असुन सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते असलेल्या एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला...
राज्यातच नव्हे तर देशात दबदबा असलेल्या नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार व राळेगण सिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले आहेत. हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनी ही निवडणूक होत असुन गावचे प्रवर्तक पोपटराव पवार यांना स्वत:लाही निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. एक शिक्षक त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध न होण्याची कारण अण्णा हजारेंनी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या सत्तेसाठी जे काही सुरु आहे, ती लोकशाही नसुन ठोकशाही आहे. सत्तेसाठी खून, मारामाऱ्या असे दृश्य पाहून नवीन तरुणांमध्येही निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होत नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे कोरोना योद्धा पत्रकारांचा सन्मान...
दिवसेंदिवस निवडणुकांचे वातावरण बदलत आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये जे चालले आहे, ते आपण पहातो आहोत. सत्तेसाठी भांडणे, खून, मारामाऱ्या सुरु आहेत. सत्तेसाठी असे प्रकार करणे ही खरी लोकशाही नाही, ही ठोकशाही झाली. हे दृश्य पाहणाऱ्या नवीन तरुणांच्या मनात महत्वाकांक्षा निर्माण होऊन त्यांनाही निवडणूक लढवावीशी वाटते. निवडणूक लढविणे हा दोष नव्हे. निवडणूक झालीच पाहिजे, असे सांगत अण्णा हजारे यांनी बंगालमधील परिस्थितीवर बोट ठेवत त्याचा संबंध बिनविरोध निवडणुका न होण्याशीही जोडला आहे.