महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर व्हावे; चंद्रकांत दादा पाटील

आपापल्या क्षेत्रात आपली जीवाची पर्वा न करता कोरोना काळात ज्या महिलांनी मोलाचे कार्य करणाऱ्या महिला ऋतुजा मोहिते उपनिरीक्षक हवेली पोलीस स्टेशन, प्रेमा पाटील पोलीस निरीक्षक, सोनाली कांबळे सामाजिक कार्यकर्त्यां, निकिता मोघे संचालिका अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, डॉ दीपा शाह आशा कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करण्यात आला.

पुणे: ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा २०२० पुणे येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष भाजप, अशोक वानखेडे (राष्ट्रीय अध्यक्ष-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन), जेष्ठ पत्रकार संजय भोकरे (राज्य संघटक-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ), गोविंद घोळवे (प्रदेशाध्यक्ष-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन), रणधीर कांबळे (वृत्त वहिनी संघ मुंबई), संदीप भटेवरा (सरचिटणीस-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन), ऍड मंदार जोशी (कायदेशीर सल्लागार-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन) आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

कोरोना काळात देशावर संकट आले या काळात आपापल्या क्षेत्रात आपली जीवाची पर्वा न करता कोरोना काळात ज्या महिलांनी मोलाचे कार्य करणाऱ्या महिला ऋतुजा मोहिते उपनिरीक्षक हवेली पोलीस स्टेशन, प्रेमा पाटील पोलीस निरीक्षक, सोनाली कांबळे सामाजिक कार्यकर्त्यां, निकिता मोघे संचालिका अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, डॉ दीपा शाह आशा कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश होता. तसेच या काळात ओंकारा फाउंडेशन व आम्ही पुणेकर या संस्थांनी मोलाची कामगिरी बजावली अशा संस्थानाचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आजाराला कंटाळून एका व्यक्तीची कंटेनरखाली आत्महत्या

महिलांनी आपापल्या क्षेत्रात अग्रेसर व्हावे व त्यांनी पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यास सक्षम व्हावे. कोणतेही क्षेत्र असू महिलांनी आपल्या स्वतःला कमी न समजता आव्हानांना सामोरे जावे, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी सक्षम महिला नेतृत्व पुढे आल्यास त्याचे स्वागत असेल, असे देखील मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन समीर देसाई (अध्यक्ष), सागर बोदगिरे (संपर्क प्रमुख), विशाल भालेराव(उपाध्यक्ष), जगदीश कुंभार(उपाध्यक्ष), मोहित शिंदे (सहसंघटक), दीपक पाटील (संघटक), धनराज गरड (खजिनदार), ज्योती गायकवाड (महिला समन्वयक), प्रिती देशपांडे, छायाचित्रकार प्रवीण वखारकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले.

Title: Women should be leaders in every field Chandrakant Dada Pat
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे