warude-murder-case

शिरूर! वरूडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यानेच कोयत्याने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वरूडे (ता. शिरूर) येथील रानमळा परिसरात राहणारे बाळासो बबन तांबे (वय 43) हे उकाड्यामुळे 8 जून रोजी पहाटे घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. रात्री सुमारे 1.20 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

मृत व्यक्तीचा भाऊ प्रकाश बबन तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मयताचे पूर्वीचे वाद, भांडणे आणि शत्रुत्व याबाबत माहिती गोळा केली. त्यावेळी वरूडे गावातील एका अल्पवयीन मुलावर संशय गेला. पोलिसांनी त्याची पालकांसमक्ष चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी मयत आणि अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला होता. तसेच आठ दिवसांपूर्वीही मयताने त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याच रागातून संबंधित मुलाने बाळासो तांबे यांच्यावर कोयत्याने गळ्यावर वार करून त्यांचा खून केल्याचे सांगितले.

पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून खूनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे आणि पोलिस कॉन्स्टेबल सुजित जगताप करत आहेत. या गुन्ह्याचा अवघ्या 36 तासांत छडा लावल्याबद्दल शिक्रापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या तपासामुळे खुनाचे गूढ लवकर उलगडण्यात पोलिसांना यश आले.

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

वरुडेत बकरे चारण्याच्या वादातून मेंढपाळांना मारहाण

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत