क्राईम

वरुडे येथे घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीची गळा चिरून हत्या

शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिरूर तालुक्यातील वरुडे येथील राणमाळ वस्तीवर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत व्यक्तीचे नाव बाळासो बबन तांबे (वय ४३) असे असून, ते आपल्या कुटुंबासह वरुडे येथे राहत होते. सोमवारी रात्री जेवणानंतर कुटुंबातील सदस्य घरात झोपले होते, तर बाळासो तांबे हे घरासमोरील कट्ट्यावर झोपले होते. रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वृद्ध आईला आरडाओरड ऐकू आल्याने ती बाहेर आली असता, अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पळून जात असल्याचे तिने पाहिले.

दरम्यान, घरातील इतर सदस्य बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या घराचे दरवाजे बाहेरून कडी लावून बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. वृद्ध आईने कडी उघडल्यानंतर कुटुंबीय बाहेर आले असता बाळासो तांबे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी प्रकाश तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या थरारक हत्येमुळे वरुडे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईतील २८ वर्षांचा अनुभव आता शिरूरच्या सेवेत; शिरूर पोलीस ठाण्याचा विनोद पाटील यांनी स्वीकारला पदभार

संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली; शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता पाटील यांच्याकडे ठाण्याचे…

4 तास ago

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

19 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

19 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

20 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

22 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

2 दिवस ago