क्राईम

आलेगाव पागात किरकोळ वादातून महिलेसह पतीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): आलेगाव पागा (ता. शिरुर) येथे घरासमोर पाणी टाकल्याचा जाब विचारल्याने झालेल्या किरकोळ वादातून एका महिलेसह महिलेच्या पतीला मारहाण करत महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे रुपाली शिंदे, बेबी कुंडलिक शिंदे, मनीषा सुरेश शिंदेव सुरेश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आलेगाव पागा (ता. शिरुर) येथील सुनंदा दिवटे या महिलेच्या घरासमोर शेजारील शिंदे कुटुंबातील महिलेने खरकटे पाणी फेकले त्यामुळे सुनंदा यांनी घरासमोर पाणी टाकल्याचा जाब विचारला त्यामुळे चिडून जाऊन रुपाली शिंदे यांसह आदींनी सुनंदा दिवटे यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्य्यांनी मारहाण केली. दरम्यान सुनंदा यांचे पती सुभाष दिवटे हे मध्ये आले असता त्यांना देखील काठीने मारहाण करत जखमी केले. दरम्यान मारहाण करणाऱ्यांनी सुनंदा यांची मुलगी सत्यश्री हिला जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत सुनंदा सुभाष शिंदे (वय ५५) रा. आलेगाव पागा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी रुपाली शिंदे, बेबी कुंडलिक शिंदे, मनीषा सुरेश शिंदेव सुरेश शिंदे सर्व रा. आलेगाव पागा (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

14 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

14 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago