क्राईम

प्रेमप्रकरणातून दिवसाढवळ्या आरोपीने तरुणावर चाकूने केले सपासप वार

बुलढाणा: बुलढाणा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने काही साथीदारांच्या मदतीने एका तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे 1 ऑगस्ट रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या निष्पाप तरुणाचे सीन सुरेश जाधव (वय 19) असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीने केलेल्या खूनाचं कारण आता समोर आलं आहे.

नेमकं काय घडल

घडलेल्या घटनेनुसार, बुलढाणा शहरातील चिखली रोड येथील हॉटेल ग्रीन लीफ येथे आरोपी देवराज माळी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन आला होता. तिथेच सुरेश जाधव त्याच ठिकाणी उपस्थित होता. त्याच वेळी ही घटना घडली. संबंधित प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. त्यामुळे ही घटना आता उघडकीस आली आहे.

हल्लेखोर देवराजने सनीला पाहिल्यानंतर त्याने आपल्या कंबरेतून धारदार चाकू काढला आणि सुरेश जाधववर हल्ला केला केल्यानंतर तो जखमी झाला. अशातच सुरेश जाधवचा मृत्यू झाला. हत्येदरम्यान, घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बुलढाणा पोलिसांनी आज तकशी साधला संवाद

बुलढाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी रवी राठोड यांनी आज तक या प्रसारमाध्यमाने माहिती दिली की, ज्याने हत्या केली त्या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्याचे आधीच संबंधित तरुणीशी ब्रेकअप झालं. त्यानंतर मृत्यू झालेल्या सनी जाधव आणि तरुणींचं एकमेकांशी प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती आरोपी देवराजला कळाल्याने त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सनी जाधवची हत्या केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 साथीदारांना एकूण 4 लोकांना अटक केली असून पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

4 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

4 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago