क्राईम

शिरुर तालुक्यात ॲट्रॉसिटी प्रकरणी तिघांवर गुन्हे

युवकासह पत्नीला मारहाण करत केली जातीवाचक शिवीगाळ

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका युवकाला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वैभव खरपुडे, दिपक चहाळ, आकाश ढमढेरे या तिघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे राहणाऱ्या वैभव खरपुडे याची दुचाकी संतोष झिणे त्याच्या नातेवाईकाने गावी नेलेली होती, वैभव याने माझी दुचाकी कोठे आहे, असे विचारले असताना संतोष याने तुझी दुचाकी आमच्या पाहुण्याने गावी नेलेली आहे असे सांगितले. मात्र संतोषने दुचाकी पाहुण्याला दिली या कारणातून वैभव व त्याच्या २ साथीदारांनी संतोष याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. दरम्यान संतोषची पत्नी मध्ये आली असता तिला देखील शिवीगाळ, दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत संतोष भगवान झिणे (वय ३२) रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी वैभव खरपुडे, दिपक चहाळ दोघे रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे, आकाश ढमढेरे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध शिवीगाळ, दमदाटी, मारहाण सह जातीवाचन शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

26 मि. ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

12 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

13 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago